आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पा शेट्टीला महागात पडले फॅनची इच्छा पूर्ण करणे, असा पकडला हात की सोडवणे झाले कठीण, व्हायरल होत आहे Video

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : डान्स रियलिटी शो 'सुपर डान्सर चॅप्टर 3'मध्ये एकदा पुन्हा शिल्पा शेट्टी, गीता कपूर आणि अनुराग बासु जज आहे. याचदरम्यान सोनीने आपल्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेयर केला आहे, ज्यामध्ये शिल्पासोबत घडलेला एक मजेशीर किस्सा दाखवला आहे. शोमध्ये एका कन्टेस्टंटच्या वडिलांची इच्छा पूर्ण करणे शिल्पाला महागात पडले. झाले असे की, परफॉर्मेन्सनंतर कंटेस्टंट म्हणाली की, त्याच्या वडिलांची इच्छा आहे की शिल्पा शेट्टीसोबत एकदा हात मिळवायचा आहे. शिल्पा हात मिळवते पण त्या कंटेस्टंटचे वडील शिल्पाचा हात इतका पक्का पकडतात की, शिल्पाला म्हणावे लागले, 'सर काय करत आहात तुम्ही….'

शोच्या एपिसोडमध्ये शिल्पा फॅन मोमेन्ट दाखवले आहे. हा एपिसोड वीकेंडला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

 

सोनी टीव्हीने आपल्या ट्विटरवर शोचा या एपिसोडचा एक प्रोमो शेयर केला आहे. या प्रोमोमध्ये छोट्या छोट्या मुलांचा डान्स पाहून जजेस हैराण होतात. एका कन्टेस्टंटच्या परफॉर्मन्सने अनुराग इतके उत्साहित होतात की, त्याला आपल्या खांद्यावर बसवून घेतात. 

बातम्या आणखी आहेत...