आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Superfit Mom : वयाच्या चाळीशीनंतरही आहे एवढी फिट, 4 मुलांना सांभाळून बॉडी बिल्डींगही करते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - जवळपास 40 व्या वर्षानंतर महिला आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासकडे फारसे लक्ष देत नाहीत. पण ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये राहणाऱ्या अमांडा जोहार्टी स्वतःला फिट ठेवण्यासाठी रोज सकाळी तीन वाजता जिममध्ये जातात. एवढेच नव्हे तर त्या दिवसातून 7 वेळा जेवण करतात. 43 वर्षीय अमांडा यांना बॉडी बिल्डिंगचा छंद आहे आणि त्यांची चार मुलेही आहेत. 


अमांडा सांगतात की, दिवसभर मुलांच्या कामांवर परिणाम होऊ नये म्हणून त्या पहाटे 3 वाजता रेल्वेने जिममध्ये जातात. मुले उटण्यापूर्वी त्या घरीदेखिल परततात. मला बॉडी बिल्डींगचा छंड आहे. त्यामुळे फिट राहण्यासाठी मी दिवसातून सात वेळा जेवण करते असेही त्या सांगतात. पुढील आठवड्यात मेलबर्नमध्ये होणाऱ्या अरनॉल्ड क्लासिक ऑस्ट्रेलियन कॉम्पिटीशनमध्येही त्या सहभागी होणार आहेत. 


स्पोर्टसच्या बाबतीत अमांडा खूपच मेहनती आहेत. पण मुलांकडेही त्यांना लक्ष द्यावे लागते. त्यामुळे सकाळी तीन वाजता जिमला जाण्यासा निर्णय घेतला. सकाळी उठून कॉफी घेऊन थेट जिमला जायचे आणि त्याठिकाणी तीन तास व्यायाम करायचा अशा प्रकारे तिचा दिवस सुरू होता. 


अमांडा जेव्हा 19 वर्षांच्या होत्या त्यावेळी त्यांनी बॉडी बिल्डिंग करण्यास सुरुवात केली होती. 27 व्या वर्षी त्यांचा विवाह झाला होता. पहिले अपत्य झाले त्यावेळी त्यांचे वय 15 ते 20 किलोने वाढले होते. पण त्यांनी पुन्हा व्यायामाने वजन कमी केले आणि फिट बनल्या. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, अमांडाचे काही PHOTOS.. 

बातम्या आणखी आहेत...