आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिअर ग्रील्ससोबत शुटिंग करताना रजनीकांत जखमी, बांदीपूर टायगर रिझर्व्हमध्ये सुरू होते चित्रिकरण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क - सुपरस्टार रजनीकांत बिअर ग्रिल्सच्या 'मॅन vs वाइल्ड' शोमध्ये दिसणार आहे. रजनीकांत आणि ग्रील्स यांनी मंगळवारी कर्नाटकातील बांदीपूर टायगर रिझर्व येथे या शोच्या चित्रिकरणाला सुरुवात केली आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रील्सच्या या शोमध्ये दिसले होते. शुटिंग दरम्यान रजनीकांतला किरकोळ दुखापत झाल्याचे सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

  

अक्षय कुमार देखील या शोसाठी करू शकतो चित्रिकरण


एका रिपोर्टनुसार, "28 आणि 30 जानेवारी रोजी दररोज खास पाहुण्यांसाठी 6 तासांच्या चित्रिकरणाची परवानगी देण्यात आली आहे. मंगळवारी याठिकाणी रजनीकांत शूटिंग करणार आहेत, तर अक्षय कुमार 30 जानेवारीला येणार असून तो त्याच शोसाठी चित्रिकरण करणार असल्याची शक्यता आहे. सुलतान बाटोरी महामार्ग आणि मैलाहल्ली, मुदार आणि काळकरे रेंजसाठी शूटिंगला परवानगी देण्यात आली आहे. ते पर्यटन-नसलेल्या क्षेत्रामध्ये शूटिंग करणार आहेत, जे विशेष वन संरक्षणाखाली असतील.

गेल्या वर्षी प्रसारित झाला होता मोदी स्पेशल एपिसोड


नरेंद्र मोदींवर चित्रीत झालेला 'मॅन vs वाइल्ड' भागाचे उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये चित्रीकरण करण्यात आले. हा एपिसोड गेल्या वर्षी 12 ऑगस्ट रोजी प्रसारित झाला होता.