आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिअर ग्रिल्ससोबत 'मॅन व्हर्सेस वाइल्ड'मध्ये झळकणार सुपरस्टार रजनीकांत, शूटींसाठी बिअर भारतात दाखल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिअर ग्रिल्ससोबत अॅडव्हेंचर केले आहे

नवी दिल्‍ली- सुपरस्टार रजनीकांत यांनी आपल्या चित्रपटातून आणि अनोख्या अंदाजातून कोट्यावधी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाने सर्वांना वेड लावणारे रजनीकांत लवकरच अॅडव्हेंचरच्या जगात पाऊल ठेवत आहे. लवकरच रजनीकांत "मॅन वर्सेज वाइल्ड" या शोमध्ये बेअर ग्रिल्ससोबत दिसणार आहेत. रजनीकांत आणि बेअर ग्रिल्सचे हे अॅडव्हेंचर बांदीपूरच्या जंगलाल होईल. 

सुपरस्टार रजनीकांत यांच्यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बेअर ग्रिल्ससोबत "मॅन वर्सेज वाइल्ड"मध्ये अॅडव्हेंचर केले आहे. मागील वर्षी 12 ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या मॅन वर्सेज वाइल्डच्या एपिसोडणध्ये मोदी बेअरसोबत उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट जंगलात गेले होते. त्या दोघांचा तो एपिसोड खूप चर्चेत आला होता. मॅन वर्सेज वाइल्ड शोदरम्यान बिअरने पंतप्रधानांना भाला दिला, तेव्हा मोदी म्हणाले, "कोणाविरोधात हिंसा करणे माझ्या संस्कारात बसत नाही." बिअर ग्रिल्ससोबत यापूर्वी अमेरीकेचे पंतप्रधान बराक ओबामा यांनीदेखील भाग घेतला आहे. त्याशिवाय हॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी बिअरसोबत अॅडव्हेंचर केले आहे.   

बातम्या आणखी आहेत...