आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्फर्म / 'द कपिल शर्मा शो'च्या पहिल्या भागात पहिला पाहुणा असेल सलमान खान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विनोदवीर कपिल शर्मा पुन्हा एकदा टीव्हीवर परतण्याची तयारी करत आहे. तो कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' परत घेऊन येत आहे. त्याची निर्मिती सलमान खान करणार आहे. हा शो आधी नोव्हेंबरमध्ये प्रसारित होणार होता, मात्र याचे प्रॉडक्शनचे काम अपूर्ण राहिल्यामुळे त्याला पोस्टपोन करण्यात आले. कपिल या शोचा पहिला भाग १६ डिसेंबर रोजी शूट करणार आहे. तेही त्याच्या लग्नानंतर कपिलचे लग्न १२ ते १३ डिसेंबर रोजी पंजाबमध्ये होणार आहे. शोच्या पहिल्या भागात अतिथी म्हणून निर्माता सलमान खानच उपस्थित राहणार आहे.

 

जवळच्या सूत्राच्या माहितीनुसार, पहिल्या भागात कुटुंबाच्या सदस्यांची माहिती देण्यात येणाार अाहे. मात्र १६ डिसेंबरला सलमानकडे वेळ आहे की नाही, याचा तपास त्याची टीम करत आहे. या दिवशी त्याचे इतर कामदेखील आहेत. 

 

गेल्या वर्षी सलमान- कपिलमध्ये बिनसले होते 
सलमान आणि कपिल दोघे सोबत आल्याने सर्व चकित झाले आहेत, कारण गेल्यावर्षी दोघांमध्ये बिनसले होते. सलमानने कपिलच्या शोमध्ये आपल्या 'ट्यूबलाइट' चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नकार दिला होता. तो कपिलच्या शोमध्ये येण्याएेवजी कपिलचा स्पर्धक असलेल्या सुनील ग्रोव्हरच्या शोमध्ये गेला होता. याचे कारण सुल्तानच्या प्रमोशनवेळी कपिलने सलमानला अनेक तास वाट पाहायला लावली होती. त्यामुळे दोघांमध्ये बोलचाल नव्हती. आता मात्र दोघांमध्ये पुन्हा मैत्री झाली आहे. सलमान कपिलच्या पुनरागमनात त्याला मदत करत आहे. 

 

सलमानने बदलली 'दबंग ३'ची स्क्रिप्ट 
सलमान सध्या पंजाबमध्ये कतरिना कैफबरोबर 'भारत'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. येथे चित्रपटाच्या शेवटच्या भागाचे शूटिंग सुरू आहे. त्यानंतर सलमान आपल्या सुपरहिट फ्रँचायझी 'दबंग' चित्रपटाच्या तिसऱ्या भागाचे शूटिंग सुरू करणार आहे. सलमानने चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये बदल केला आहे. सूत्रांच्या माहितीप्रमाणे, त्याच मागील चित्रपट 'रेस 3'ने बॉक्स ऑफिसवर चांगले प्रदर्शन केले नव्हते. त्यामुळे सलमान सजग झाला आहे. त्यामुळे तो 'भारत'च्या स्क्रिप्टवर पूर्ण लक्ष देत आहे. याबरोबरच तो 'दबंग 3'ची स्क्रिप्ट हाताळत आहे. त्याने स्क्रिप्टमध्ये बदल केला आहे. या कारणामुळे चित्रपट थोडा लेट झाला. या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये सुरू होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...