• Home
  • Gossip
  • Superstars shows was flop on the small screen, now the sequel of those shows to be seen on the digital platform

Bollywood / छोट्या पडद्यावर फ्लॉप ठरले सुपरस्टार्सचे शो, आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर झळकणार याचे सिक्वल  

अमिताभ करू शकतात पदार्पण, अनुराग कश्यप बनवू शकतात वेब शो 

दिव्य मराठी वेब

Jul 10,2019 06:49:53 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : टीव्ही आणि वेब शोजचे प्रेक्षक वेगवेगळे आहेत. ही बाब आता हळूहळू निर्मात्यांच्या लक्षात येत आहे. काही वर्षांपूर्वी भारतात डिजिटल माध्यम नव्हते तेव्हा निर्माते टीव्हीच्या टार्गेट ऑडियन्ससाठी काही मोठ्या मालिका घेऊन आले होते. त्यामध्ये '24', 'युद्ध' आणि 'पुकार' यांचा समावेश होता. या तिन्ही मालिकांमध्ये चित्रपटाशी संबंधित कलावंत अनिल कपूर, अमिताभ बच्चन आणि निर्माते विपुल अमृतलाल शहा होते. योगायोगाने तिन्ही मालिकांना अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नव्हता. '24' मालिकेचा तर दुसरा सीझनही आला, परंतु निर्मात्यांनी जी अपेक्षा केली होती त्यानुसार प्रेक्षकांना ही मालिका आकर्षित करू शकली नाही. दुसरीकडे 'युद्ध'चा पुढील भाग अनुराग कश्यप बनवणार होते, परंतु हा प्रोजेक्टही रखडला.

प्रेक्षकांना आवडली नाही संकल्पना
या सर्व मालिका टीव्हीवर अपयशी ठरण्यामागे प्रेक्षक हे सर्वात मोठे कारण आहे. मालिकेचे भविष्य प्रेक्षकच ठरवतात. प्रेक्षक कोणतीही मालिका जेवढी जास्त पाहतात, तेवढीच त्याची टीआरपी वाढते. यामुळेच मालिकेला रेटिंग मिळते. कमी रेटिंग मिळाल्यास अनेक मालिकांचे निर्माते आपल्या मालिकेत बदल करत तो हिट बनवण्याचा प्रयत्न करतात. तर आता शो बंद करण्यात येईल, असा अल्टिमेटमही काही चॅनेल्सकडून दिला जातो. अशा वेळी काही निर्मात्यांना आपला शो बंद करावा लागतो. या मालिकांच्या बाबतीतही असेल झाले आहे.

निर्माता विपुलने पुन्हा टीव्हीवर पुनरागमन केले नाही...
'पुकार'नंतर विपुल शहाने छोट्या पडद्यावर पुनरागमन केले नाही. तिन्ही मालिकांची पार्श्वभूमी थोडी शहरी आणि चित्रपटांसारखी होती, हे यामागचे कारण असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे टीव्हीवर त्या चालू शकल्या नाहीत. आता ऐकण्यात येत आहे की, या तिन्ही मालिकांचा पुढचा भाग निर्माण करावा, अशी विनंती डिजिटल प्लॅटफॉर्मवाले करत आहेत. सूत्रांच्या मते, नेटफ्लि‍क्सकडून अनिल कपूर आणि अनुराग कश्यप यांना ऑफर मिळाली आहे. त्यांनी आपल्या मालिकांच्या पुढील भागावर वेबसाठी काम करावे, असे त्यांना सांगितले जात आहे.

तर '24'चे दिग्दर्शक अभिनय देव आपले डॉक्यू फिक्शन 'दुसरा' वेब प्लॅटफॉर्मवरच रिलीज करत आहेत. ते म्हणाले...'पुढील भागावर सध्या प्राथमिक चर्चा सुरू आहे. सध्या कोणतीच अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तशा प्रकारच्या मालिकांसाठी परफेक्ट प्लॅटफॉर्म म्हणायचे झाल्यास डिजिटल प्लॅटफॉर्म हाच पर्याय आहे. आजपासून चार-पाच वर्षांपूर्वी आमच्याकडे असा प्लॅटफॉर्म नव्हता. अशा वेळी आपल्याला टीव्ही हाच पर्याय होता. आता आपल्या मालिका हिट बनवण्यासाठी निर्माते वेगळी रणनीती आखत आहेत.' विपुलनेदेखील वेबमध्ये पाऊल टाकले आहे.

'साड्डा हक' आणि 'इश्क में मरजावां' मालिका बनवणाऱ्या ममता यश पटनायक म्हणाल्या...'टीव्हीचा प्रेक्षक वेगळा आहे. त्यामुळेच '24', 'पुकार' आणि 'युद्ध' चालल्या नाहीत. या मालिकांची संकल्पना प्रेक्षकांना आवडली नाही. तथापि, टीव्हीवर फक्त 'सास-बहू', 'नाग-नागिन' आणि सुपरनॅचरल मालिकाच चालतात, असेही नाही.

या दिग्गज अभिनेत्यांचे शोदेखील झाले फ्लॉप
- 'क्या आप पांचवीं पास से तेज़ हैं' : शाहरुख खान (होस्ट)
- 'छप्पर फाड़ के' : गोविंदा (होस्ट)
- 'कहीं ना कहीं कोई है' : माधुरी दीक्षित
- 'खतरों के खिलाड़ी' : अर्जुन कपूर

X
COMMENT