आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधविश्वास : मुलाच्या मृत्यूनंतर आत्मा नेण्यासाठी आले रुग्णालयात 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 कोटा - राजस्थानातील कोटा येथील एका खासगी रुग्णालयात अंधविश्वासाची प्रचिती आली. रुग्णालयात दोन वर्षांपूर्वी एका लहान मुलाचे निधन झाले. त्याचा आत्मा नेण्यासाठी पालक एका मांत्रिकासह आले होते. मांत्रिकाने पालकासह सुमारे ३० मिनिटे पूजा केली. दरम्यान, पूजाविधी पाहण्यासाठी तेथे बघ्यांची गर्दी जमली होती. लोकांनी माहिती दिल्यानंतर पोलिस तेथे दाखल झाले.पोलिसांनी त्यांना हुसकावून लावले. मृत मुलाचा आत्मा रुग्णालयात भटकत असल्याचा मांत्रिकाचा दावा होता. 


मंत्रविद्येने आपण त्याच्या आत्म्यास सोबत नेणार आहोत. पोलिसांनी सांगितले,  पालकांनी त्या मांत्रिकास बुंदी जिल्ह्यातून आणले होते. आपण पुन्हा असा विधी करणार नाही, असा कबुलीजबाब दिल्यानंतर पोलिसांनी मांत्रिकाला सोडून दिले. घरात शांतता राहावी म्हणून हा विधी पालकांनी  केला होता, असे नातेवाइकांनी सांगितले.