Home | National | Delhi | superstitious mother murdered 7 month old baby girl in new delhi

Delhi: अंधश्रद्धेत आईने केली 7 महिन्यांच्या लेकीची हत्या; म्हणाली ती अशुभ होती...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 02, 2018, 11:00 AM IST

हजरत निजामुद्दीन परिसरात एका महिलेने आपल्या पोटच्या 7 महिन्यांच्या मुलीचा खून केला.

  • superstitious mother murdered 7 month old baby girl in new delhi

    नवी दिल्ली - देशाच्या राजधानीतील हजरत निजामुद्दीन परिसरात एका महिलेने आपल्या पोटच्या 7 महिन्यांच्या मुलीचा खून केला. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा तिने आपली मुलगी अशुभ असल्याने हे कृत्य केल्याची कबुली दिली. मुलीने जन्म घेतला तेव्हापासूनच परिवारावर संकट ओढवले असेही ती महिला म्हणाली. सुरुवातीला या आरोपी आईने आपल्या मुलीचा मृत्यू पाण्याच्या बादलीत बुडाल्याने झाल्याचा दावा केला होता. परंतु, पोस्टमॉर्टममध्ये तिने केलेल्या अमानवीय कृत्याचा खुलासा झाला. पोलिसांनी अटक करून चौकशी केली तेव्हा तिने संपूर्ण घटनाक्रम सांगितला.


    27 वर्षीय महिलेचे नाव अदीबा आहे. ती जामिया विद्यापीठातून अंडर ग्रॅजुएट आहे. साऊथ ईस्ट दिल्लीचे डीसीपी चिन्मय बिश्वाल यांनी सांगितल्याप्रमाणे, 20 ऑगस्टच्या संध्याकाळी 5.30 वाजता मूलचंद रुग्णालयात पोलिसांना एका 7 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी चौकशीमध्ये अदीबाने (आई) तिचा खून केल्याचे समोर आले आहे. अदीबाने पोलिसांना सांगितले, की "त्या मुलीचा जन्म झाला तेव्हापासून आमच्या कुटुंबातील सगळेच आजारी पडले. आर्थिक परिस्थिती अतिशय विकट बनली होती. ती आमच्या कुटुंबासाठी अशुभ होती." चिमुकली झोपेत असताना आईने आपल्या ओढणीने तिचा गळा आवळला. यानंतर पाण्याने भरलेल्या बादलीत तिचा मृतदेह बुडवून बाहेर काढला. तसेच पुन्हा बेडवर ठेवून दिला. यानंतर ती आपल्या पतीच्या दुकानावर धावून गेली आणि यासंदर्भातील माहिती दिली. अदीबाने सर्वांना असेच सांगितले, की त्या मुलीचा पाण्याच्या बादलीत बुडून मृत्यू झाला आहे.


    त्या चिमुकलीचा मृतदेह पाहून पोलिसांना महिलेच्या दाव्यावर शंका आली. पाण्याच्या बादलीत बुडून मृत्यू झाला असेल तर मुलीच्या गळ्याभोवती लाल खुणा कुठून आल्या असा सवाल पोलिसांनी उपस्थित केला. त्यामुळे, पोलिसांनी तो मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यामध्ये मुलीचा मृत्यू पाण्यात बुडून नव्हे, तर गळा आवळून झाल्याचे समोर आले.
    पोलिसांनी घटनास्थळावरून खून करण्यासाठी वापरण्यात आलेली ओढणी जप्त केली आहे. तसेच अदीबाला मुलीच्या खून प्रकरणात अटक केली.

Trending