आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या विरोधातील पक्षांचा सरकार स्थापनेसाठी पाठिंबा मिळतोय : नायडू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्रात तिसऱ्या आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी रविवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार व माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांची पुन्हा भेट घेतली. नायडू संपुआ अध्यक्ष सोनिया गांधी यांनाही भेटले. 


सपा प्रमुख अखिलेश यादव व बसपा प्रमुख मायावती यांच्याशी झालेल्या भेटीतील तपशील नायडूंनी या नेत्यांना कळवल्याचे सूत्रांनी सांगितले. नायडूंनी शनिवारी अखिलेश व मायावतींची भेट घेतली होती. मायावती तिसऱ्या आघाडीच्या प्रस्तावावर सहमत झाल्याचे मानले जाते. आता त्या सोमवारी दिल्लीला जाऊन राहुल व सोनियांसोबत चर्चा करणार आहेत. विरोधी पक्षांचे सरकार सत्ता स्थापन करेल, असा दावा नायडूंनी केला आहे. तिसऱ्या आघाडीसाठी भाजपच्या विरोधातील पक्षांचा चांगला पाठिंबा मिळू लागल्याचे त्यांनी सांगितले. नायडू शनिवारी सहा व शुक्रवारी दोन पक्षांच्या नेत्यांना भेटले होते. त्यात राहुल गांधी, पवार, येचुरी यांचा समावेश आहे. नायडूंशी चर्चा झाल्यानंतर सोनियांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व काँग्रेसच्या इतर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. या बैठकीत २३ मे रोजी होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीबाबत चर्चा केल्याचे मानले जाते.