आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारजवाडीच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलांना आर्वीच्या शांतिवनचा आधार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारजवाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी मल्हारी बटुळे यांच्या मुलांसमवेत दीपक नागरगोजे व अन्य. - Divya Marathi
भारजवाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी मल्हारी बटुळे यांच्या मुलांसमवेत दीपक नागरगोजे व अन्य.
  • मुलाने शेतकरी आत्महत्येवर कविता सादर केल्यानंतर काही तासांतच पित्याने आत्महत्या केल्याने जनमन झाले होते स्तब्ध

अमाेल मुळे

बीड - शाळेत मुलाने शेतकरी आत्महत्येवर कविता सादर केल्यानंतर काही तासांत पित्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना भारजवाडी (ता. पाथर्डी) येथे घडली होती. या घटनेने राज्यभरात हळहळ व्यक्त होत होती. आत्महत्याग्रस्त शेतकरी मल्हारी बटुळे यांच्या तिन्ही मुलांचे पालकत्व आर्वी (ता. िशरूर) येथील शांतिवन सामाजिक प्रकल्पाने स्वीकारले. शनिवारी प्रकल्पाचे संचालक दीपक नागरगोजे यांनी बटुळे कुटुंबीयांची भेट घेत त्यांना धीर दिला.भारजवाडी (ता. पाथर्डी) येथील हनुमाननगर जि. प. शाळेत २७ फेब्रुवारी २०२० रोजी  मराठी भाषा दिनानिमित्त काव्यवाचन कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते.  तिसरीत शिकणारा प्रशांत मल्हारी बटुळे याने स्वरचित शेतकरी आत्महत्या विषयावर कविता सादर  केली. शेतकरी आत्महत्येची स्थिती, शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर त्यांचे कुटुंब कसे उघड्यावर पडते हे ताे आपल्या कवितेतून पोटतिडकीने मांडत होता. परिस्थितीशी लढण्याचा संदेश तो देत होता. पण त्याच दिवशी सायंकाळी त्याचे वडील मल्हारी बटुळे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून विष घेत आत्महत्या केली आणि प्रशांतसह त्याचा एक भाऊ, बहीण, आई, वृद्ध आजी-आजोबा यांचा आधारच कोसळला.  दरम्यान, ऊसतोड कामगार, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काम करणाऱ्या शिरूर तालुक्यातील आर्वी येथील शांतिवन सामाजिक प्रकल्पाचे दीपक नागरगोजे यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी (७ मार्च) त्यांनी बटुळे कुटुंबाची भेट घेतली. आत्महत्या केलेल्या मल्हारी यांना  तिसरीत शिकणारा प्रशांत, सातवीत शिकणारी प्रीती आणि पाचवीत शिकणारा प्रमोद अशी अपत्ये आहेत. शिवाय पत्नी आणि वृद्ध आईवडीलही आहेत. तिन्ही मुले हुशार असून ते हनुमाननगरच्या शाळेत सध्या शिक्षण घेत आहेत. मुलांना शिकवून मोठे करण्याचे मल्हारी यांचे स्वप्न होते, मात्र परिस्थितीपुढे त्यांनी हात टेकले. त्यांच्या आत्महत्येनंतर आता या मुलांचे संपूर्ण पालकत्व शांतिवन संस्थेने स्वीकारले आहे. शनिवारी दीपक नागरगोजे यांनी या कुटुंबाशी चर्चा केली. नव्या शैक्षणिक सत्रात तिन्ही मुले शांतिवनमध्ये दाखल होणार आहेत. मदतीसाठी सरसावले हात

दरम्यान, बटुळे कुटुंबीयांना मदतीसाठी अनेक ठिकाणांहून हात सरसावले आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षेनेते प्रवीण दरेकर यांनी कुटुंबाची भेट घेत मदतीची घोषणा केली, तर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनीही मदतीची घोषणा केली आहे.