मैदानात कुणीही येऊ / मैदानात कुणीही येऊ द्या, जनता माझ्या पाठीशी : खासदार चंद्रकांत खैरे यांना विश्वास

तीस वर्षांपासून शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने मी जनतेच्या सेवेत असून लोकसभेच्या मैदानात कुणालाही येऊ द्या. जनता व शिवसेना माझ्या सोबत असल्याचे प्रतिपादन खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले. दरम्यान, मला लोकसभा निवडणुकीत मताची आघाडी येथील शिवसैनिकांनी दिली असल्याने मैदानात कुणीही येऊ द्या जनता माझ्या पाठीशी आहे, असेही ते म्हणाले.

प्रतिनिधी

Oct 01,2018 08:29:00 AM IST

कन्नड- तीस वर्षांपासून शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने मी जनतेच्या सेवेत असून लोकसभेच्या मैदानात कुणालाही येऊ द्या. जनता व शिवसेना माझ्या सोबत असल्याचे प्रतिपादन खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले. दरम्यान, मला लोकसभा निवडणुकीत मताची आघाडी येथील शिवसैनिकांनी दिली असल्याने मैदानात कुणीही येऊ द्या जनता माझ्या पाठीशी आहे, असेही ते म्हणाले.


शहरातील जैन मंगल कार्यालयात शिवसेनेच्या वतीने शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपनेते खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, माजी महापौर कला ओझा, डॉ.अण्णा शिंदे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, उपजिल्हाप्रमुख अवचित वळवळे, राजेंद्र राठोड, केतन काजे, मारोती राठोड, उदयसिंग राजपूत, महिला संघटक रंजना कुलकर्णी, माजी सभापती हर्षलीताई मुठ्ठे, मीनाताई राठोड, उपतालुकाप्रमुख शिवाजी थेटे, माजी शहरप्रमुख सुनील सोनावणे, शहरप्रमुख राम पवार, नगरसेवक बंटी सुरे, डॉ. सदाशिव पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. कन्नड तालुक्यातील जनता सतत शिवसेना पक्षासोबत असून मला लोकसभा निवडणुकीत मताची आघाडी येथील शिवसैनिकांनी दिली असल्याने मैदानात कुणीही येऊ द्या जनता माझ्या पाठीशी असल्याने मी कुणाचे नाव घेऊन कुणाला मोठे करु इच्छित नाही. तर जो आपल्या वडिलांचा अनादर करतो माझ्यासोबत राहून माझी बदनामी करतो, अशा लोकांच्या विरोधात मला बोलायचे नाही. मी कधीही कुणाचा अनादर केला नसून तर सुरुवातीला आमदारकीचा राजीनामा दिला होता तेव्हा त्यांच्या पत्नीने मला सांगितल्याने मी विधानसभा अध्यक्ष यांना सांगून राजीनामा मंजूर होऊ दिला नाही तर अडीच वर्षांपूर्वीच पोट निवडणूक होऊन वेगळे चित्र बघण्यास मिळाले असते, असे खासदार खैरे यांनी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे नाव न घेता टीका केली. यावेळी अशोक दापके, संजय मोटे, दिलीप मुठ्ठे, दीपक बोडखे, संजय पिंपळे, संजय राजपूत, फुलचंद कुंठे, विश्वनाथ त्रिभुवन, विलास पाटणी, अनिता शिंदे, उज्ज्वला बिरारीस आदींची उपस्थिती होती.


तालुक्याचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना सोडून लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केल्याने या शिवसेना मेळाव्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. खासदार खैरे यांना कन्नड तालुक्यातून मतांची आघाडी मिळते ती जर आमदार जाधव हे लोकसभेला उभे राहिले तर मते कमी होता कामा नये म्हणून खबरदारी घेतल्या जात आहे. जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी भाषणाला उठले तेव्हा त्यांनी खासदार खैरे हे तालुक्यातील निंभोरा गावचे भूमिपुत्र आहेत असा उल्लेख केला.

X
COMMENT