Home | Gossip | Supporting Stars Played Powerful Role In Hindi Films, Parineeti Chopra Sunny Deol

परिणीतीपासून माधुरीपर्यंत, चित्रपटातील लीड स्टार्सपेक्षा अभिनयात या 7 स्टार्सनी मारली बाजी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 06, 2018, 12:49 PM IST

आम्ही तुम्हाला अशाच काही स्टार्सविषयी सांगत आहोत, ज्यांनी सपोर्टिंग रोल साकारुन अभिनयाच लीड स्टारपेक्षा बाजी मारली.

 • Supporting Stars Played Powerful Role In Hindi Films, Parineeti Chopra Sunny Deol

  प्रत्येक चित्रपटातील मुख्य भूमिकांसोबत काही सहकलाकारही असतात. पण अनेकदा अभिनयात मुख्य कलाकारांपेक्षा सहकलाकारच त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच काही स्टार्सविषयी सांगत आहोत, ज्यांनी सपोर्टिंग रोल साकारुन अभिनयाच लीड स्टारपेक्षा बाजी मारली.


  'लेडीज वर्सेस रिकी बहल'मधील परिणीती चोप्रा
  2011 साली आलेल्या 'लेडीज वर्सेज रिकी बहल' चित्रपटात परिणीती चोप्रा सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत होती. पण तरीही परिणीतीची भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. चित्रपटातील मुख्य भूमिकेत अनुष्का शर्मा होती.

  'देवदास' मधील माधुरी दीक्षित
  'देवदास' (2002) चित्रपटात माधुरी दीक्षितने चंद्रमुखीची भूमिका केली होती. ऐश्वर्याने केलेल्या पारोच्या भूमिकेहून माधुरीची भूमिका पसंत केली गेली. सहअभिनेत्री असूनही अभिनेत्रीच्या भूमिकेच्या तोडीची भूमिका माधुरीने केली होती. यासाठी माधुरीला सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला.


  पुढच्या स्लाईडवर वाचा, अशाच काही खास अभिनेत्यांविषयी..

 • Supporting Stars Played Powerful Role In Hindi Films, Parineeti Chopra Sunny Deol

  'फॅशन'मधील कंगना राणावत 

  2008 साली आलेला चित्रपट 'फॅशन'मध्ये प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत होती पण कंगना राणावतने तिच्या रोलने प्रेक्षकांना जास्त प्रभावित केले. या चित्रपटासाठी कंगनाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 

 • Supporting Stars Played Powerful Role In Hindi Films, Parineeti Chopra Sunny Deol

  'सत्या'मधील मनोज वाजपेयी 
  'सत्या' चित्रपटातील भिक्खू मात्रेची भूमिका कोण बरे विसरु शकेल. सत्या चित्रपटात मुख्य भूमिकेत जेडी चक्रवर्ती हा अभिनेता होता पण 'सत्या' हे नाव ऐकले तरी लोकांना पहिले मनोज वाजपेयीच आठवतो. या चित्रपटासाठी मनोज कुमारला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 

   

 • Supporting Stars Played Powerful Role In Hindi Films, Parineeti Chopra Sunny Deol

  'हेराफेरी'मधील परेश रावल 

  परेश रावलने करिअरच्या सुरुवातीच्या काळात बॉलिवूडमध्ये नकारात्मक भूमिकेमुळे ओळख मिळवली होती. पण 'हेराफेरी' (2000) चित्रपटातील बाबू भैयाच्या रोलमुळे त्यांची ओळख कॉमेडीयन म्हणून झाली. 'हेराफेरी' चित्रपटात अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी लीडरोलमध्ये होते पण परेश रावलने त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटासाठी परेश रावल यांना बेस्ट कॉमेडीयनचा पुरस्कारही मिळाला. 

 • Supporting Stars Played Powerful Role In Hindi Films, Parineeti Chopra Sunny Deol

  'ओमकारा'मधील सैफ अली खान
  ओमकारा चित्रपटात सैफ अली खान सहकलाकाराच्या भूमिकेत होता पण त्याचा अभिनय मुख्य कलाकार अजय देवगणपेक्षा काही कमी नव्हता. त्याने निभावलेली लंगडा त्यागीची भूमिका लोकांनी फार पसंत केली. या चित्रपटासाठी सैफला बेस्ट व्हिलनचा पुरस्कारही मिळाला. 

   

 • Supporting Stars Played Powerful Role In Hindi Films, Parineeti Chopra Sunny Deol

  'दामिनी'मधील सनी देओल
  1993 साली आलेला दामिनी चित्रपटात सनी देओल सहअभिनेत्याच्या रोलमध्ये होता. पण चित्रपटाने नाव समोर आले की पहिला चेहरा डोळ्यासमोर येतो तो सनी देओलचा. या चित्रपटासाठी सनी देओलला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. 

Trending