Home | National | Delhi | Supreme Court Building : most modern building of the Supreme Court, made in 885 crores

सुप्रीम कोर्ट भवन : 12.18 एकरात उभारण्यात आली सु्प्रीम कोर्टाची सर्वात आधुनिक इमारत, तब्बत 885 कोटी रुपये आला खर्च

दिव्य मराठी वेब, | Update - Jul 18, 2019, 12:10 PM IST

1800 कार पार्किंगची क्षमता, सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण इमारतीत 825 सीसीटीव्ही कॅमेरे

 • Supreme Court Building : most modern building of the Supreme Court, made in 885 crores

  नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी सप्रीम कोर्टाच्या नवीन इमारतीचे उद्‌घाटन केले. यावेळी सुप्रीम कोर्टाची नवीन इमारत सौर ऊर्जा, पर्यावरण आणि जलसंरक्षणाने परिपूर्ण असल्यामुळे अनोखी असल्याचे ते म्हणाले. यावेळी सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस रंजन गोगाई आणि कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांची उपस्थिती होती.


  12.19 एकरात पसरलेल्या या नवीन इमारतीला सुरुंगाद्वारे सुप्रीम कोर्टाच्या जुन्या इमारतीशी जोडण्यात आले आहे. या इमारतीवर 885 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. सु्प्रीम कोर्टाचे सर्व प्रशासकीय कामे, खटल्याची फायलिंग, कोर्टाचे आदेश आणि निर्णयाच्या सर्व प्रती घेणे इत्यादी सर्व कामे जुन्या इमारतीतून या नवीन इमारतीत हलविण्यात येणार आहे. पण न्यायालये मात्र जुन्या इमारतीतच राहणार आहेत.


  आता सुप्रीम कोर्टाचे निर्णय नऊ भाषांमध्ये
  यावेळी राष्ट्रपती कोविंद यांनी सुप्रीम कोर्टाकडून सुनावण्यात येणारे निर्णय 7 स्थानिक भाषांमध्ये अनुवाद करण्याच्या सुविधेचे अनावरण केले. ते म्हणाले की, आता सुप्रीम कोर्टाचे निर्णय इतर स्थानिक भाषांमध्ये होणार असल्यामुळे याचा मला आनंद आहे. हे निर्णय सुप्रीम कोर्टाच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात येणार येतील.

  नवीन भवनात प्रशासकीय कामकाज आणि रजिस्ट्री होणार, न्यायालये मात्र जुन्या इमारतीतच

  > नवीन भवनात सु्प्रीम कोर्टाच्या सर्व दस्ताऐवजांचे डिजिटल रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे. यासाठी एक आयटी सेल बनवण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या संपूर्ण इमारतीत 825 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे.

  > जुन्या आणि नव्या इमारतीत ये-जा करण्यासाठी तीन भूमिगत मार्ग आहेत. यातील एक मार्ग न्यायाधिशांसाठी, दूसरा कोर्टातील रेकॉर्डची ने-आण करण्यासाठी आणि तिसरा मार्ग वकिलांसाठी करण्यात आला आहे.

  > या इमारतीती 1 लाख लीटर क्षमतेचे रेन वॉटर हार्वेस्टिंग प्लांट लावण्यात आले आहे. यात पावसाचे पाणी साचवण्यात येणार आहे. सोबतच दोन वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट लावण्यात आले आहेत. यामुळे सीवेज पाण्याला पिण्यायोग्य बनवण्यात येणार आहे.


  > या भवनात 20 लाख डिमोलीशन वेस्ट ब्लॉक लावण्यात आले आहे. देशात प्रथमच एखाद्या इमारतीत इतक्या कचऱ्याचा वापर करण्यात आला आहे. या भवनात 1800 गाड्यांच्या पार्किंगची क्षमता आहे.


  नवी इमारत : इमारतीमध्ये ज्यूडिशरी ब्लॉक, लायब्ररी ब्लॉक आणि ऑडिटोरियम आहे. सोबतच या भवनात सेंट्रलाइज्ड एसी आहे. इमारतीसाठी लागणाऱ्या विजेची 40% गरज सौर ऊर्जेपासून पूर्ण होणार आहे.


  ऑडिटोरियम : 650 आणि 250 लोकांची क्षमता असलेले दोन विश्व स्तरीय ऑडिटोरियम, एक मीटिंग रूम आणि एक मोठी गोल टेबल कॉन्फ्रेंन्स रूम तयार करण्यात आले आहे.

 • Supreme Court Building : most modern building of the Supreme Court, made in 885 crores
 • Supreme Court Building : most modern building of the Supreme Court, made in 885 crores
 • Supreme Court Building : most modern building of the Supreme Court, made in 885 crores
 • Supreme Court Building : most modern building of the Supreme Court, made in 885 crores

Trending