आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अयोध्या प्रकरणात सर्वच पक्षांचे युक्तीवाद पूर्ण; सुप्रीम कोर्टाकडून अंतिम निकाल राखीव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अयोध्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने सुनावणी पूर्ण केली. सर्वच पक्षांचे युक्तीवाद वेळ पूर्ण होण्याआधीच ऐकून घेतले. यानंतर अयोध्या प्रकरणी आपला ऐतिहासिक निकाल राखीव ठेवला आहे. गेल्या 40 दिवसांपासून या प्रकरणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती. आज संध्याकाळी 5 वाजेच्या दरम्यान सुनावणी पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, तासाभरापूर्वीच सर्वांचे युक्तीवाद ऐकून घेण्यात आले. यावर आवश्यक औपचारिक कारवाई झाल्यानंतर येत्या 23 दिवसांत अंतिम निकाल येऊ शकतो. "मुस्लिम अयोध्येतील इतर मशीदमध्ये नमाज अदा करू शकतात"
 
मंगळवारी सुनावनी दरम्यान, हिंदू पक्षाचे जेष्ठ वकील के. पाराशरण म्हणाले की, बाबरने अयोध्येत मशीद बनवून जी चूक केली, त्याला सुधारण्याची गरज आहे. अयोध्येत अनेक मशीद आहेत, जिथे मुस्लिम समाजातील लोक नमाज अदा करू शकतात. पण, भगवान रामाचे जन्मस्थान बदलू शकत नाहीत. यावर्षी 6 ऑगस्टपासून चीफ जस्टिसच्या अध्यक्षतेखाली 5 न्यायाधिशांच्या बँचने या प्रकरणाची नियमित सुनावनी घेत आहेत.

पाराशरण सुप्रीम कोर्टोत महंत सुरेश दास यांच्यातर्फे बोलत आहेत. सुरेश दास यांच्यावर सुन्नी वक्फ बोर्ड आणि इतरांकडून खटला दाखल केला आहे. पाराशरण म्हणाले की, "बाबरने भारतावर विजय मिळवला आणि आयोध्येत भगवा रामचे जन्मस्थान हटवून मस्जिद बनवण्याची ऐतिहासिक चूक केली." 'एकदा मंदीर होते, आता मंदीरच राहील'
 
5 न्याधीशांच्या बँचमध्ये मुख्य न्यायाधीशांशिवाय यांच्या शिवाय जस्टिस एसए बोबडे, जस्टिस डीवाई चंद्रचूड, जस्टिस अशोक भूषण आणि जस्टिस एसए नजीर आहेत. बँचने मंगळवारी पाराशरण यांना अनेक मुद्यांवर प्रश्न केले. बँचने सांगितले की, "मुस्लिम पक्षाचे म्हणने आहे की, एकदा मशीद बनली की, ती मशीदच राहील. तुम्हाला ते मान्य आहे का?" त्यावर पाराशरण म्हणाले की, "मी याचे समर्थन नाही करत. तसं तर मी म्हणले- "एकदा मंदीर बांधले, तर ते मंदीरच राहील."

बातम्या आणखी आहेत...