आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - सर्वाेच्च न्यायालयाने रॅनबॅक्सीचे माजी प्रवर्तक बंधू मलविंदर आणि शिविंदर सिंग यांना जपानी कंपनी दाइची सांक्यो खटल्यात दोषी ठरवले. औषध उत्पादक दाइची सांक्योने ३,५०० कोटी रुपये न चुकवल्यामुळे सिंग बंधूंविरुद्ध सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबत सर्वोच्च न्यायालय म्हणाले, सिंग बंधूंनी फोर्टिस हेल्थकेअरमध्ये आपले समभाग विकून त्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. सिंगापूरच्या लवादाने २०१६ मध्ये सिंग बंधूंना सांगितले होते की,त्यांनी दाइचीला ३,५०० कोटी रुपये द्यावेत. दाइचीने सर्वाेच्च न्यायालयाला केलेल्या विनंतीत सिंग बंधूंकडून लवादाच्या आदेशाचे पालन करण्यास सांगावे. सरन्यायाधीश गोगोई आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या पीठाने त्यांना दोषी ठरवले.
रॅनबॅक्सीला दाइची सांक्योला विकले
मलविंदर सिंग आणि शिविंदर सिंग यांनी २००८ मध्ये रॅनबॅक्सीला दाइची सांक्योला विकले होते. यानंतर सन फार्मास्युटिकल्सने दाइचीकडून ३.२ अब्ज डॉलरमध्ये रॅनबॅक्सीची खरेदी केली होती. जपानी औषधी निर्माती कंपनीचा आरोप आहे की, सिंग बंधूंनी त्यांना रॅबॅक्सी विकताना वस्तुस्थिती झाकून ठेवली होती. जपानी फर्मने सिंग बंधूंविरुद्ध न्यायालयात अवमानना याचिका दाखल केली होती. यामध्ये आरोप ठेवला होता की, लवादाचा निर्णय संकटात पडला आहे. कारण, सिंग बंधूंनी फोर्टिस समूहात आपल्या नियंत्रणातील समभाग मलेशियाच्या कंपनीस विकले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.