आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण: आनंद तेलतुंबडे यांची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली, मात्र अटकेपासून संरक्षण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- कोरेगाव भीमा परिसरात एक जानेवारी 2018 रोजी झालेल्या हिंसाचारप्रकरणी प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांच्याविरोधात पुणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने सोमवारी फेटाळली. पोलिस तपासात हस्तक्षेप करणार नसल्याचे मत कोर्टाने व्यक्त केले. मात्र, तेलतुंबडे यांना अटकेपासून चार आठवड्यांचा अंतरिम दिलासा कोर्टाने दिला आहे.

 

शहरी नक्षलवादाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा रद्द दाखल केला होता. हा गुन्हा रद्द करण्‍यासाठी तेलतुंबडे यांनी सुप्रीम कोर्टात विशेष याचिका दाखल केली होती. यावर सोमवारी सुनावणी झाली.

 

या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याचे निरीक्षण पोलिसांनी कोर्टात नोंदवले. त्यामुळे आता गुन्हा रद्द करणे योग्य ठरणार नाही. तपासात आणखी माहिती उजेडात येत आहे, असेही पोलिसांनी कोर्टात सांग‍ितले.

 

दरम्यान, कोरेगाव भीमामध्ये गेल्यावर्षी एक जानेवारीला झालेल्या हिंसाचार झाला होता. त्याचे संपूर्ण महाराष्‍ट्रासह इतर राज्यात पडसाद उमटले होते. 

 

5160 पानांचे आरोपपत्र दाखल...

दरम्यान, भीमा-कोरेगाव प्रकरणात पुणे पोलिसांनी एकूण 10 आरोपींविरोधात बेकायदा कृत्ये प्रतिबंध कायद्यांतर्गत 5160 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्र दाखल झालेल्या 10 आरोपींपैकी सुधीर ढवळे, रोना विल्सन, सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन आणि महेश राऊत यांना सहा जून रोजीच अटक करण्यात आली होती.

 

उर्वरित पाच आरोपींपैकी प्रशांत बोस, रितुपर्ण गोस्वामी, दिपू आणि मंगलू यांना 28 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपांवरून त्यांना अटक करण्यात आली.

 

बातम्या आणखी आहेत...