अयोध्या / श्रीरामांनी म्हणे स्वप्नात सांगितले, त्यांचे जन्मस्थान या घुमटाखालीच - या युक्तिवादावर विश्वास कसा ठेवणार : मुस्लिम पक्ष

'बाबरनामानुसार मशीद बाबराच्या आदेशावरून त्याचा कमांडर मीर बाकी याने बांधली'

वृत्तसंस्था

Sep 21,2019 07:56:00 AM IST

नवी दिल्ली - अयोध्याप्रश्नी शुक्रवारी सुप्रीम कोर्टात २८ व्या दिवशी सुनावणी झाली. बाबरी मशीद पाडून सत्य संपवायचे हा उद्देश होता, असा युक्तिवाद मुस्लिम पक्षकारांनी केला. यानंतर जमीन हिंदूंची असल्याचे दावे झाले. म्हणजेच मशीद ही मंदिर बांधण्याच्या उद्देशानेच पाडण्यात आली. हिंदू पक्षकार सांगताहेत की, श्रीराम स्वप्नात आले. त्यांनी आपले जन्मस्थान मशिदीच्या मध्यवर्ती घुमटाखाली असल्याचे सांगितले. यावर विश्वास ठेवणार, असे मुस्लिम पक्षकार म्हणाले.


सुन्नी वक्फ बोर्डाच्या वतीने अॅड. राजीव धवन म्हणाले, “बाबरनामानुसार मशीद बाबराच्या आदेशावरून त्याचा कमांडर मीर बाकी याने बांधली. ३ शिलालेखांत हा उल्लेख आहे. यावर हिंदूंचा आक्षेप योग्य नाही.’ न्या. एस. ए. बोबडे यांनी विचारले, मशिदीत संस्कृतचे काही पुरावे आहेत. यावर अॅड. धवन म्हणाले, मशीद बांधणारे बहुतांश कामगार मुस्लिम नव्हे, हिंदू होते. काम सुरू करण्यापूर्वी ते विश्वकर्मा आणि इतर देवतांची पूजा करत. काम पूर्ण झाल्यावर काही लेख तेथे कोरत असत.

X
COMMENT