आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Supreme Court Hearing From October On 14 Petitions Challenging Cancellation Of Article 370

३७० रद्दनंतरचे २३ दिवस : ‘३७० रद्द’ला आव्हान देणाऱ्या १४ याचिकांवर सुप्रीम कोर्टात ऑक्टोबरपासून होणार सुनावणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या सर्व १४ याचिकांवर सुप्रीम कोर्ट ऑक्टोबरपासून सुनावणी करेल. या याचिका घटनापीठाकडे पाठवण्यात आल्या. दरम्यान, काश्मीर टाइम्सच्या संपादिका अनुराधा भसीन यांच्या याचिकेवर केंद्र व राज्य प्रशासनाकडून सुप्रीम कोर्टाने सात दिवसांत म्हणणे मागवले आहे. माध्यमे, इंटरनेटसह संवाद माध्यमांवर टाकलेल्या बंदीविरुद्ध ही याचिका आहे.
५० हजारांवर नोकऱ्यांची हमी : राज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले, काश्मीरमध्ये २-३ महिन्यांत ५० हजारांहून अधिक युवकांना नोकऱ्या मिळतील. सफरचंदांच्या खरेदीसाठी ५ हजार कोटी रुपये ठेवले आहेत. ५ ऑगस्टपासून काश्मीर खोऱ्यात एकाही नागरिकाचा दहशतवादी घटनेत मृत्यू झालेला नाही.

येचुरींना दौऱ्याची परवानगी :
सीताराम येचुरी यांना सुप्रीम कोर्टाने खोऱ्यातील माकप नेते एम. यू. तारिगामी यांची भेट घेण्यासाठी दौऱ्याची परवानगी दिली आहे. दरम्यान, पाकने ३१ ऑगस्टपर्यंत भारतीय विमानांसाठी हवाई मार्ग बंद केला आहे. पाकने बालाकोटनंतर भारतासाठी ११ हवाई मार्ग बंद केले तेव्हा दूर पल्ल्याच्या मार्गामुळे भारताचे ६४० कोटींचे नुकसान झाले. तर पाकला ३६० कोटी रुपये शुल्कावर पाणी सोडावे लागले होेते. 
 

कलम-३७०चे समर्थन करणाऱ्यांना जनता जोड्याने मारेल : राज्यपाल सत्यपाल मलिक
राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे की, ‘राहुल गांधी राजकारणात लहान आहेत. एक काँग्रेस नेता संसदेत काश्मीरचा संबंध संयुक्त राष्ट्रसंघाशी जोडत असताना राहुल यांनी त्याला थांबवायला हवे होते. मात्र, तसे घडले नाही. निवडणूक येऊ द्या, मग बघा... विरोधक सांगत राहतील की, हे काँग्रेसवाले कलम ३७० चे समर्थक आहेत आणि जनता त्यांना जोड्याने मारेल.’

बातम्या आणखी आहेत...