आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ram Mandir: देशातील सुप्रीम कोर्ट आपलेच, राम मंदिर आवश्य बांधले जाणार! भाजपच्या सहकार मंत्र्याचे विधान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनौ - देशातील सुप्रीम कोर्ट आपलेच असल्याने राम मंदिर आवश्य बांधले जाणार असे विधान भाजपच्या एका मंत्र्याने केले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कॅबिनेटमध्ये सहकार मंत्री असलेले मुकूट बिहारी वर्मा यांनी असे म्हटले आहे. राम मंदिरचा मुद्दा सुप्रीम कोर्टात विचाराधीन असतानाही उत्तर प्रदेश सरकारमधून त्यावर विविध प्रकारची विधाने करणाऱ्यांमध्ये वर्मा दुसरे भाजप नेते आहेत.


आणखी काय म्हणाले वर्मा..?
पत्रकारांशी संवाद साधताना वर्मा म्हणाले, "राम मंदिर निर्धारित वेळेवर बांधले जाणारच या आश्वासनावर देशात आणि राज्यात भाजप सत्तेवर आला आणि हाच आमचा संकल्प आहे. हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात आहे आणि सर्वोच्च न्यायालय सुद्धा आपलेच आहे. या देशातील न्यायमंडळच नव्हे, तर प्रशासन, समस्त राष्ट्र आणि राम मंदिर सुद्धा आपलेच आहे."


सुप्रीम कोर्टात निर्णय विचाराधीन...
> अलाहाबाद उच्च न्यायालयाने 2010 मध्ये बाबरी विध्वंस झाल्याचे ठिकाण तीन भागांमध्ये विभागून देण्याचा निकाल दिला होता. त्यामध्ये सुन्नी वक्फ बोर्ड, निरमोही अखाडा दल आणि राम लल्ला असे तीन पक्ष आहेत. परंतु, उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध सुप्रीम कोर्टात 14 विविध प्रकारच्या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. 
> यापूर्वी जून महिन्यातच उत्तर प्रदेशचे उप-मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही केलेल्या वक्तव्यावर वाद झाला होता. इतर पर्यायांना वेळ लागत असेल तर भाजप सरकार राम मंदिर बांधण्यासाठी कायदा आणणार आहे. न्यायालयात या संदर्भातील निकालास जास्त वेळ लागू नये. अन्यथा चर्चेतून किंवा संसदेत कायदा पास करून राम मंदिर बांधण्याचे पर्याय निवडले जातील असे ते म्हणाले होते. 

बातम्या आणखी आहेत...