आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Supreme Court Judge Angry Over Lawyers' Argument Is There A Moral Or Not, That Money Is Everything For You?

वकिलांच्या युक्तीवर संतापलेले सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती म्हणाले- नैतिकता आहे की नाही, की तुमच्यासाठी पैसा हेच सर्वकाही आहे?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली  - सर्वोच्च न्यायालयाला गुंगारा देण्याचे अनोखे प्रकरण उघडकीस आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अरुण मिश्रा यांनी वकिलाची युक्ती ओळखली आणि त्याला फटकारले.  झाले असे की, अनधिकृत बांधकाम प्रकरणाच्या एका खटल्यात वकिलाने चतुराई दाखवत सुटीतील पीठ बदलाचा फायदा उचलला. न्या. अरुण मिश्रा यांच्या पीठाने या प्रकरणात ते बांधकाम पाडण्याचे आदेश मे महिन्यात दिले होते. वकिलाने सुटीत कार्यरत असलेल्या पीठाकडून यावर स्थगिती आणली. शुक्रवारी हे प्रकरण पुन्हा न्या. मिश्रा यांच्या पीठाकडे सुनावणीसाठी आले, तेव्हा वकिलाच्या या चलाखीवर ते संतापले. न्या. मिश्रा यांनी ही न्यायालयाची फसवणूक असल्याचे सांगून अनधिकृत इमारती पाडण्याचे आदेश नव्याने जारी केले. न्या. मिश्रा म्हणाले की, तुमची नैतिकता कोठे गेली आहे, की पैसाच तुमच्यासाठी सर्व काही आहे? केरळातील मराडू नगरपालिका क्षेत्रातील तट नियंत्रण विभागात (सीआरझेड) उभारण्यात आलेल्या इमारतीचे हे प्रकरण आहे.

 

अशी लक्षात आली वकिलांची युक्ती |  
न्या. अरुण मिश्रा तसेच न्या. नवीन सिन्हा यांच्या पीठासमोर शुक्रवारी हे प्रकरण आले. त्यांनी अनधिकृत इमारती पाडण्याच्या आदेशावरील कार्यवाहीचा अहवाल मागितला. त्यावर याचिकाकर्त्याने सांगितले की, या आदेशाला कोर्टाने स्टे दिला आहे. त्यावर न्या. मिश्रा यांनी याचिकाकर्त्याला फटकारले. ते म्हणाले,  ही कोर्टाची फसवणूक आहे. सुटीतील पीठाने ही सुनावणी करायला नको होती. या पीठाने जी न्यायिक अनियमितता केली आहे, त्यासाठी याचिकाकर्ताच जबाबदार आहे.