आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता राज्य ठरवणार दिवाळीच्या दिवशी फटाके फोडण्याच्या वेळा, सुप्रीम कोर्टाने आदेशामध्ये केली दुरुस्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने दिवाळीला फटाके फोडण्याच्या आदेशामध्ये दुरुस्ती केली आहे. त्यात कोर्टाने राज्यांना सूट देत म्हटले आहे की, राज्यांनी त्यांच्या राज्यांच्या सोयीप्रमाणे फटाके फोडण्याच्या वेळा ठरवाव्यात. याआधी कोर्टाने रात्री आठ ते दहा वाजेदरम्यानत फटाके फोडण्याचा आदेश दिला होता. पण कोर्टाने हेही स्पष्ट केले आहे की, एका दिवसात दोन तासांपेक्षा जास्त वेळ फटाके फोडता येणार नाहीत. 


दिल्ली एनसीआरमध्ये ग्रीन फटाके फोडा  
जस्टीस ए.के.सिकरी आणि जस्टीस अशोक भूषण यांच्या पीठाने ग्रीन फटाके फोडण्याच्या आदेशावरील गूढ कमी करत म्हटले की, त्याबाबतचा आदेश संपूर्ण देशासाठी नव्हे तर फक्त दिल्ली एनसीआरसाठी लागू होईल. या मुद्द्यावरून तमिळनाडू सरकार आणि पटाके निर्मात्यांच्या वतीने कोर्टात एक याचिका दाखल कऱण्यात आली होती. त्यात धार्मिक बाबींमध्ये नियमांतून सूट देण्याची विनंती करण्यात आली होती. तर फटाके निर्मात्यांनी दिवालीला ग्रीन फटाक्याच्या आदेशात बदल करण्याची मागणी केली होती. 


सुप्रीम कोर्टाचे दिशा निर्देश 
सुप्रीम कोर्टाने प्रदूषणाच्या मुद्द्यावरून दिवाळीच्या काळात एका दिवसात दोन तास फक्त कमी प्रदूषण पसरवणारे फटाके फोडण्याचा आदेश दिली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याचे कोर्टाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल होईल. त्यासाठी प्रत्येक भागातील संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी असेल. त्याशिवाय ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या उत्सवाबाबतही दिशानिर्देश जारी करण्यात आले आहे. त्यानुसार 11.55 ते 12.30 पर्यंतच फटाके फोडता येतील. 

बातम्या आणखी आहेत...