आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Supreme Court Refuses To Postpone Maratha Reservation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मराठा समाजाला महाराष्ट्रात देण्यात आलेल्या आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने बुधवारी नकार दिला. यामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. 



न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव व न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने या आरक्षणास अंतरिम स्थगिती देण्यास नकार देताना याप्रकरणी अंतिम सुनावणी १७ मार्चपासून केली जाईल, 
असे स्पष्ट केले. त्यानंतर मात्र सुनावणीबाबत कोणतेही युक्तिवाद ऐकून घेतले जाणार नाहीत, असेही खंडपीठाने नमूद केले.  



राज्य सरकारने शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारच्या या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. मात्र, मुंबई हायकोर्टाने या संबंधातील याचिका फेटाळून लावली. याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. इंदिरा साहनी प्रकरणी घटनापीठाने निश्चित केलेल्या आरक्षणावर ५० टक्क्यांच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे या याचिकेत म्हटले आहे. दरम्यान, राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापली आहे.