आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Supreme Court Refuses To Postpone Reservation, Next Hearing On March 17

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा समाजाला दिलासा; आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, पुढील सुनावणी 17 मार्चला

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्थिगिती देण्याचा अंतरिम आदेश देता येणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने आज सुनावणीदरम्यान स्पष्ट केले

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. मराठा आरक्षणाच्या निर्णयावर स्थिगिती देण्याचा अंतरिम आदेश देता येणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणीदरम्यान स्पष्ट केले. या प्रकरणावरील पुढील सुनावणी आता 17 मार्चला सुरू होणार आहे. या निर्णयामुळे तुर्तास मराठा समाजाला दिलासा मिळाला आहे.

इंदिरा साहनी प्रकरणी घटनापीठाने निश्चित केलेल्या आरक्षणावर 50 टक्क्यांच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे या याचिकेत म्हटले आहे. राज्य सरकारने शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारच्या या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. मात्र, मुंबई हायकोर्टाने या संबंधातील याचिका फेटाळून लावली. या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज (बुधवार) सुनावणी घेताना सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला.