आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CBI च्या संचालकपदी पुन्हा आलोक वर्मा, धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही -सुप्रीम कोर्ट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयच्या संचालकपदी पुन्हा आलोक वर्मा यांनाच नियुक्ती देण्याचे आदेश जारी केले आहेत. मात्र, त्यांना या पदावर असताना महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. सीबीआयचे संचालक आणि उपसंचालक यांच्यात वाद सुरू असताना केंद्र सरकारने हस्तक्षेप करून संचालक आलोक वर्मा यांनी सक्तीच्या रजेवर पाठवले होते. त्यानंतर वर्मा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाचा आदेश केंद्र सरकारला मोठा दणका मानला जात आहे.

 

सीबीआय विरुद्ध सीबीआय अशा या वादात सुप्रीम कोर्टाने आपला महत्वाचा निकाल मंगळवारी जारी केला. सीबीआयचे प्रमुख आलोक वर्मा यांच्या याचिकेवर ही सुनावणी झाली. तत्पूर्वी 6 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीत चीफ जस्टिस रंजन गोगोई, जस्टिस संजय किशन कौल आणि जस्टिस केएम जोसेफ यांच्या खंडपीठाने आलोक वर्मा यांच्या कॉमन कॉज याचिकेवर आपला निकाल सुरक्षित ठेवला होता. चीफ जस्टिस रंजन गोगोई मंगळवारी सुटीवर असल्याने जस्टिस संजय किशन यांनी हा निकाल वाचून सांगितला. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालात आलोक वर्मा यांना सुटीवर पाठवण्याचा निर्णय रद्द केला. सोबतच, आलोक वर्मा यांना पुन्हा पद दिले जात असले तरी त्यांना महत्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. कोर्टाने आपला निकाल निवड समितीकडे पाठवला आहे. पुढील निर्णय निवड समिती घेणार आहे. या समितीमध्ये पंतप्रधानांसह विरोधी पक्षाचे नेते आणि सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस यांचा समावेश आहे.

 

Supreme Court reinstates Alok Verma as CBI Director, however, he cannot take major policy decisions. pic.twitter.com/k5NMFdRbyU

— ANI (@ANI) January 8, 2019

 

 

 

बातम्या आणखी आहेत...