आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Supreme Court Rejects All 18 Reconsideration Petitions In Ayodhya Case

राम मंदिराचा मार्ग मोकळा, सुप्रीम कोर्टाने रामजन्मभूमी प्रकरणातील सर्व 18 पुनर्विचार याचिका फेटाळल्या

8 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या जमीन वाद प्रकरणात 9 नोव्हेंबर रोजी ऐतिहासिक निकाल दिला
  • बहुतांश याचिका कोर्टाच्या निर्णयावर असमाधानी असलेल्या मुस्लिम पक्षांकडून दाखल करण्यात आल्या होत्या

नवी दिल्ली - अयोध्येतील राम मंदिराचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अयोध्या विवादीत जमीन प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या 18 पुनर्विचार याचिकांवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायाधीश एस ए बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने या सर्व याचिका फेटाळल्या. इतर चार न्यायाधीशांमध्ये न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती एस ए नजीर, न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड़ आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना होते. सप्रीम कोर्टाने 9 नोव्हेंबर रोजी ऐतिहासिक निकाल दिला. अयोध्येतील विवादीत 2.7 एकर जमिनीवर ट्रस्टद्वारे मंदीर उभारण्याचे आणि मुस्लिम पक्षाला मशिदीसाठी अयोध्येतच 5 एकर जागा देण्याचे आदेश दिले होते. कोर्टाच्या या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी 18 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यापैकी बहुतांश याचिका कोर्टाच्या निर्णयाबाबत असमाधानी मुस्लिम पक्षांकडून करण्यात आल्या होत्या.