आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - बलात्कार प्रकरणी सुप्रीम कोर्टात धाव घेणाऱ्या आसारामच्या हाती निराशा लागली आहे. सुप्रीम कोर्टाने त्याच्या जामीनाचा अर्ज सोमवारी फेटाळून लावला. गुजरातच्या सुरत बलात्कार प्रकरणी तुरुंगात असलेल्या आसारामने जामिनाची मागणी केली होती. प्रकरणाच्या सुनावणीमध्ये गुजरात सरकारने त्याच्या जामीनाला विरोध केला. सुरत बलात्कारात आणखी 10 साक्षीदारांचे जबाब नोंदवणे बाकी आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या आसारामने यापूर्वी गुजरात हायकोर्टात सुद्धा अर्ज जामीन आणि शिक्षेवर आक्षेप घेणारी याचिका दाखल केली होती. परंतु, 26 मार्च रोजी झालेल्या सुनावणी हायकोर्टाने सुद्धा आसारामची याचिका फेटाळली.
आसारामवर केवळ बलात्कारच नाही तर हत्येचा सुद्धा आरोप लावण्यात आला आहे. याच प्रकरणात तो सध्या तुरुंगात आहे. राजस्थानच्या जोधपूर येथील आश्रमात त्याने 2013 मध्ये 16 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचे जोधपूर कोर्टात सिद्ध झाले आहे. आसाराम आणि इतर चार जणांच्या विरोधात पोक्सो, अल्पवयीनांवर अत्याचार आणि भारतीय दंड विधानाच्या गंभीर कलमा लावण्यात आल्या होत्या. कोर्टाने आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. देश आणि विदेशात 400 हून अधिक आश्रम स्थापित करणाऱ्या आसारामने साबरमती नदीकाठी एका छोट्याशा झोपडीतून सुरुवात केली होती. अवघ्या 4 दशकांमध्ये तो 10 हजार कोटींचा मालक बनला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.