आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Supreme Court Reserves Judgment On Petition Filed Against Arrest Of Five Activist

पाचही कार्यकर्त्यांच्या सुटकेवर निकाल राखीव; कोरेगाव भीमा प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात पाचही मानवी हक्क कार्यकर्त्यांच्या अटकेविरुद्ध दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. कोर्टाने सुनावणी पूर्ण करत सर्व पक्षांना सोमवारपर्यंत लेखी बाजू मांडण्यास सांगितले. सरन्यायाधीश दीपक मिश्रांनी अति. सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांना केस डायरी सोपवण्याचे निर्देश दिले. 


महाराष्ट्र पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत याचिकाकर्त्यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, तपासाच्या विश्वसनीयतेवर शंका असेल तेव्हा एसआयटी चौकशी करण्यात आली पाहिजे. त्यावर प्रतिवाद करताना वकील हरीश साळवे म्हणाले,  एसआयटीची मागणी गंभीर आहे. त्यांना सीबीआय, एनआयएवर विश्वास नसेल तर मग कुणावर आहे? ते एफबीआयवर विश्वास ठेवतील का?

बातम्या आणखी आहेत...