आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आलोक वर्मांवरील कारवाईच्या विरोधातील याचिकेवरील सुनावणी पूर्ण, सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला निकाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सीबीआयमधील वादाच्या खटल्याबाबतची सुनावणी पूर्ण झाली असून सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी निकाल राखून ठेवला आहे. सीबीआय प्रमुख आलोक वर्मा यांनी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या केंद्राच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यासंदर्भात बुधवार पाठोपाठ गुरुवारीही सुनावणी झाली. 


या खटल्यासंदर्भात बुधवारी झालेल्या सुनावणीत अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल म्हणाले होते की, सीबीआयमधील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मांजरांसारखे वाद सुरू होते. मीडियामध्ये बातम्या येत होत्या, त्यामुळे सीबीआयची प्रतिमा मलिन होत होती. अशा स्थितीत लोकांचा विश्वास कायम राहावा या उद्देशाने वर्मा यांचे काम थांबवण्यात आले होते. 


देशातील सर्वोच्च तपास संस्था असलेल्या सीबीआयचे दोन वरिष्ठ अधिकारी आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांच्यात वाद सुरू होता. त्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय दक्षता आयोगाच्या शिफारसीवरून केंद्र सरकारने दोन्ही अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. केंद्राच्या या निर्णयाच्या विरोधात वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

 

बातम्या आणखी आहेत...