आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रीम कोर्टाने म्हटले विवाहबाह्य संबंध गुन्हा नाही; पत्नीने दगा दिल्यास काय कराल? वाचा काय म्हणाले वकील!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - सर्वोच्च न्यायालयाने 150 वर्षे जुना असलेला व्यभिचार संदर्भातील कायदा कलम 497 रद्द करत असल्याचा ऐतिहासिक निकाल गुरुवारी जाहीर केला. त्यानुसार, आता विवाहबाह्य संबंध गुन्हा ठरणार नाही. यापूर्वी विवाहबाह्य संबंधांसाठी फक्त पुरुषांना दोषी ठरवले जात होते. तसेच महिलांवर यात कुठल्याही प्रकारच्या कारवाईची तरतूद नव्हती. देशात महिला आणि पुरुष समान असल्याचे निरीक्षण नोंदवताना व्यभिचार गुन्हा नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले. भारतीय दंड विधान 497 रद्द झाल्यानंतर आता पुढे काय असा प्रश्न सर्वांना पडला असेल. त्यावर आम्ही  मध्य प्रदेश हायकोर्टाचे अॅडव्होकेट संजय मेहरा यांच्याशी बातचीत करून तज्ज्ञांचे सल्ले मांडले आहेत. सोबतच, आता पार्टनरने दगा दिल्यास काय करता येईल याचेही उत्तर मिळू शकते. 


घटस्फोट घेण्याचा अधिकार
अॅड. मेहरा यांच्या मते, या बदलानुसार कोणताही पार्टनर विवाहबाह्य शारीरिक संबंध प्रस्थापित करत असेल तर त्याचा पार्टनर घटस्फोट घेऊ शकतो. हा घटस्फोट घेण्यासाठी मोठा अधिकार झाला आहे. सुप्रीम कोर्टाने सुद्धा याला नागरी स्वरुपाचा नियम म्हटले आहे. कोर्टाने सांगितले, की हा कायदा 150 वर्षे जुना आहे. सद्यस्थितीत या कायद्याची काहीही गरज नाही. अशा परिस्थितीत रिलेशनशिप तोडण्यासाठी कुणीही घटस्फोट घेऊ शकतो. महिला सुद्धा स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात. एखाद्या व्यक्तीचे वैवाहिक आयुष्य व्यवस्थित नसेल तर ती व्यक्ती घटस्फोट घेऊ शकते. 


अशा प्रकरणांमध्ये होत नाही तक्रार
अॅड मेहरा यांनी सांगितल्याप्रमाणे, विवाहबाह्य संबंधांच्या प्रकरणांमध्ये अधिकृत तक्रार क्वचितच केली जाते. कारण, यात कुटुंब, समाज आणि मान-सन्मान इत्यादींचा प्रश्न येतो. अशा प्रकारचे संबंध गुप-चूप बनवले जातात. विवाहबाह्य संबंधांमध्ये कुणी पकडले गेल्यास पार्टनर दुसरे आरोप दाखल करतो. व्यभिचार उघडकीस आल्यास वाद आणि भांडण होतात. परंतु, अनेक प्रकरणांमध्ये हत्या सुद्धा झाल्या आहेत. आता पार्टनरचे विवाहबाह्य संबंध असल्यास समोरील व्यक्ती घटस्फोट घेऊ शकते. सोबतच, ज्यांचे बाहेर संबंध आहेत ते सुद्धा घटस्फोट घेऊ शकतात.

 

बातम्या आणखी आहेत...