आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, राज्यसभेच्या निवडणुकीत करता येणार नाही NOTA चा वापर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. राज्यसभा निवडणुकीत NOTA चा वापर करता येणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. गुजरात काँग्रेसचे चीफ व्हीप शैलेश मनुभाई परमार यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे. काँग्रेसबरोबरच एनडीए सरकारनेही राज्यसभा निवडणुकीत NOTA ला विरोध केला होता. 


सुप्रीम कोर्टात याबाबतची सुनावणी 30 जुलैला पूर्ण झाली होती. त्यानंतर निर्णय राखून ठेवण्यात आला होता. निवडणूक आयोगाने म्हटले होते की, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच राज्यसभा निवडणुकीत NOTA चा वापर केला होता. 2013 मदील सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करत याचा वापर सुरू केला होता, असे सांगण्यात आले. 


2013 च्या आदेशात सुप्रीम कोर्टाने म्हटले होते की, मतदाराला ज्याप्रमाणे मत देण्याचा अधिकार आहे, त्याचप्रमाणे त्याला कोणालाही मत न देण्याचाही अधिकार आहे. सर्व प्रकारच्या निवडणुकींसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या हा आदेश लागू होणार होता. राज्यसभा निवडणूक प्रक्रिया आधीच क्लिष्ट आहे, त्या प्रक्रियेला अधिक क्लिष्ट का बनवायचे असे कोर्टाने म्हटले. 

 

बातम्या आणखी आहेत...