आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रीम कोर्टाकडून काही बदलांसह आधारची वैधता कायम, बँक-मोबाईलशी लिंक करण्याचा निर्णय रद्द

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आधारच्या सक्तीबाबत सुप्रीम कोर्टाने बुधवारी महत्त्वाचा निर्णय दिला. आधार ही देशातील सामान्य नागरिकाची ओळख असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. त्याचवेळी कोणतीही खासगी कंपनी किंवा मोबाईल कंपन्या आधार कार्डसाठी सक्ती करू शकत नसल्याचे सुप्रीम कोर्टाच्या आदेशात म्हटले आहे.  

 

सुप्रीम कोर्टाने काय म्हटले.. 

- आधारमुळे समाजातील अशिक्षित लोकांनाही ओळख मिळाली आहे. 
- आधारचे डुप्लिकेट तयार करणे शक्य नाही. समाजातील मोठ्या वर्गाला आधारमुळे शक्ती मिळाली आहे. 

- आधार सामान्य नागरिकाची ओळख आहे. युनिकचा अर्थ फक्त एक असा होतो. 

-  मोबाईल किंवा खासगी कंपन्या आधारची सक्ती करू शकत नाही. 
- बायोमेट्रिक डेटाची नक्कल करणे शक्य नाही. 
- आधार हे विचारपूर्ण उचललेले पाऊल. ऑथेंटिकेशन डेटा 6 महीन्यांपर्यंतच ठेवता येऊ शकतो. डेटा कमीत कमी असावा. 
- खासगी कंपन्यांना डेटा मिळता कामा नये. 
- यूजीसी आणि एनआयएफटी सारख्या संस्था आधार मागू शकत नाही. 
- आधारमुळे देशातील मोठ्या वर्गाला फायदा झाला आहे. 
- शाळांमध्ये आधारची सक्ती करता येणार नाही. 
- अवैध घुसखोरी केलेल्यांना आधार मिळणार नाही याची काळजी घ्यावी. 

- आधारमुळे प्रायव्हसीमध्ये हस्तक्षेपाचे पुरावे नाहीत. 

- काही बदलांसह आधारची वैधता कायम. 

- आधार पॅन कार्डशी लिंक करण्याचा निर्णय कायम राहणार

- आधार बँक खाते आणि मोबाईलशी लिंक करण्याचा निर्णय रद्द

 

 

बातम्या आणखी आहेत...