आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Supreme Court To Pronounce Verdict On Demand For Floor Test In Maharashtra Govt Formation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपला दणका; बहुमतासाठी 24 तासांचा कालावधी, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय  

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुप्त मतदान नको, लाईव्ह टेलिकास्ट करा- कोर्ट

नवी दिल्ली- महाराष्ट्रातील सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयात भाजपला जोरदार दणका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रामना, अशोक भूषण आणि संजीव खन्ना यांनी उद्याच बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे, फडणवीस सरकारला 27 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. तसेच, यात कोणतेही गुप्त मतदान होणार नाही, सर्व निकालाचे लाईव्ह टेलिकास्ट केले जाईल, असेही न्यायालयाने सांगितले.


उद्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत चाचणी भाजपला घ्यावी लागणार आहे. बहुमत चाचणीसाठी हंगामी अध्यक्षांची नियुक्ती करण्यात यावी असे आदेशही सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आले आहेत. तसेच, विधानसभा अध्यक्षांची निवडही लाईव्ह करण्यात यावी. हंगामी अध्यक्षांच्या अंतर्गत बहुमत चाचणी घ्यावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. यामुळे आता बुधवारी सायंकाळी पाच वाजेपुर्वी सर्व आमदारांचे शपथविधी पूर्ण करुन भाजपला बहुमताची चाचणी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आले आहे.
कोर्टाने सोमवारी दिड तास झालेल्या सुनावनीत सर्व पक्षांची बाजू ऐकली आणि निकाल राखीव ठेवला. विरोधकांनी 24 तासात फ्लोअर टेस्ट करण्याची मागणी केली होती. केंद्राचे म्हणने आहे की, फ्लोअर टेस्ट सर्वात चांगला पर्याय आहे, पण 24 तासातच व्हावा असं काही नाही. यावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसची बाजू मांडणारे वकील म्हणाले की, जर दोन्ही पक्षांना फ्लोअर टेस्ट हवी असेल, तर यात वाईट काय आहे आणि उशीर का होतोय? राष्ट्रवादी-काँग्रेसने सुनावनीदरम्यान, 162 आमदारांचे समर्थनपत्र सादर करण्याची मागणी केली, पण कोर्टाने याची परवानगी दिली नाही. 
जस्टिस एनवी रमना, जस्टिस अशोक भूषण आणि जस्टिस संजीव खन्ना यांच्यासमोर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता (केंद्र), कपिल सिब्बल (शिवसेना), अभिषेक मनु सिंघवी (राष्ट्रवादी-काँग्रेस), मुकुल रोहतगी (देवेंद्र फडणवीस), मनिंदर सिंह (अजित पवार) यांनी आपापल्या बाजू मांडल्या. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर विरोधी पक्षा आपल्या भूमिका स्पष्ट करतील. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवारांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार निर्णय घेतली. सोमवारी राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ अजित पवारांची मनधरणी करण्यासाठी गेलो होते. बाहेर येताच भूजबळ म्हणाले की, आम्ही अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन परत पक्षात येण्याची विनंती केली आहे.हॉटेल ग्रँड हयातमध्ये विरोधकांचे शक्तिप्रदर्शन
 
सोमवारी रात्री विरोधी पक्षातील 162 आमदारांनी मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये शक्ति प्रदर्शन केले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख अध्यक्ष उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार, जेष्ठ काँग्रेस नेते मलिकार्जुन खर्गे आणि प्रदेश अध्यक्ष बालासाहब थोरात उपस्थित होते.