आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मशीद इस्लामचा अभिन्न भाग नाही- सुप्रीम कोर्ट; अयोध्या वादावर येत्या २९ ऑक्टोबरपासून सुनावणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अयोध्या वादात मुस्लिम पक्षकारांना सुप्रीम कोर्टाकडून गुरुवारी झटका बसला. मशिदीला इस्लामचा अभिन्न भाग न मानण्याची टिप्पणी असलेला २४ वर्षांपूर्वीचा निकाल फेरविचारासाठी ७ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे पाठवण्यास कोर्टाने नकार दिला. अयाेध्या खटल्यात मूळ जमिनीच्या मालकी वादावर २९ ऑक्टोबरपासून सुनावणी सुरू होईल. सरन्यायाधीश दीपक मिश्रा २ ऑक्टोबरला निवृत्त झाल्यानंतर पुन्हा ३ जजचे न्यायपीठ स्थापले जाईल. 


१९९४ मध्ये इस्माईल फारुकींच्या निकालात कोर्ट म्हणाले होते, मशीद हा इस्लामचा अभिन्न भाग नाही. मशिदीशिवाय इतर जागीही मुस्लिम नमाज अदा करू शकतात. मुस्लिम पक्षकारांनी अयोध्या वादावरील सुनावणीआधी या निकालावर पुनर्विचाराची मागणी केली होती. 


२-१ बहुमताने निकाल 
प्रत्येक समुदायासाठी मशीद, चर्च व मंदिर महत्त्वाचे असते. सम्राट अशोकच्या शिलालेखांत प्रत्येक धर्म महान असल्याचे म्हटले आहे. कोर्ट प्रत्येक निकाल वेगळ्या परिस्थितीत सुनावत असते. १९९४ चा निकाल भूसंपादनाबाबत होता. अयोध्या वादावर सुनावणीत हा मुद्दा समाविष्ट करता येत नाही. त्यावर पुराव्यांच्या आधारेच निकाल दिला जाईल. 
- सरन्यायाधीश दीपक मिश्रा, 
- न्यायमूर्ती अशोक भूषण 


व्यापक तपास-पडताळणीविनाच म्हटले गेले की, इस्लामसाठी मशीद महत्त्वाची नाही. धार्मिक परंपरा, सिद्धांत व मान्यतांना लक्षात घेऊनच त्याचा फैसला घ्यावा लागेल. मुलींच्या खतनावरही मोठ्या पीठात सुनावणी व्हावी. जमीन वाद खटल्यात अलाहाबाद हायकोर्टाच्या निकालातही १९९४ च्या निकालाचा उल्लेख आहे. 
- न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर 

 

बातम्या आणखी आहेत...