आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Supreme Court Worried On Social Media; Thinking About Using A Feature Phone Without A Smartphone: Judge Gupta

सोशल मीडियावर सुप्रीम कोर्ट चिंतित; स्मार्टफोन न वापरता फीचर फोन वापरण्याचा विचार करतोय : न्या. गुप्ता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली  - सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या गुन्ह्यांबाबत सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली आहे. मंगळवारी कोर्ट म्हणाले की, देशात तंत्रज्ञानाचा वापर धोकादायक ‌वळणावर आला आहे. न्या. दीपक गुप्ता आणि न्या. अनिरुद्ध बोस यांच्या पीठाने सोशल मीडियाचा गैरवापर थांबवण्यासाठी सरकारला मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. पीठाने म्हटले की, ही तत्त्वे केव्हापर्यंत तयार होतील याबाबत सरकारने तीन आठवड्यांच्या आत शपथपत्र दाखल करावे. 

सर्वोच्च न्यायालयात सायबर गुन्हे करणाऱ्यांचा माग काढणे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून भ्रामक आणि चुकीच्या बाबी व्हायरल करण्यासंबंधी मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावर न्या. गुप्ता म्हणाले की, सोशल मीडियाचा गैरवापर धोकादायक असल्याचे सांगून न्या. गुप्ता म्हणाले की,  मी स्मार्टफोन न वापरता साधा फीचर फोन पुन्हा वापरण्याचा विचार करतो आहे. 
 

मार्गदर्शक तत्त्वे नसतील तर एके-४७ ही विकत मिळेल...

न्या. गुप्ता म्हणाले, अशा स्वरूपाचे गुन्हे रोखणे ही न्यायालयाची जबाबदारी नाही. सरकार शक्तिमान आहे. लोकांच्या खासगी हक्कांचे संरक्षण करायला हवे. खासगीपणा जपण्यासाठी सोशल मीडियावर भ्रामक माहिती टाकणाऱ्यांचा माग लागला पाहिजे. सरकारने असे केले नाही तर उद्या लोक एके- ४७ ही खरेदी करू लागतील. कोर्ट म्हणाले,  हे सर्व रोखण्यासाठी सरकार मार्गदर्शक तत्त्वे आणत असल्याचे आम्ही ऐकले आहे.