• Home
  • National
  • Supreme courts says Mayawati have to return public money spent on statues

मायावतींना पुतळ्यांवर खर्च / मायावतींना पुतळ्यांवर खर्च झालेला जनतेचा पैसा परत कारावा लागेल, सुप्रीम कोर्टाने फटकारले  

Feb 08,2019 02:47:00 PM IST

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांना पुतळ्यांवर खर्च केलेला जनतेचा पैसा परत करावा लागणार आहे. एका याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने ही टिपण्णी केली. लखनऊ आणि नोयडामध्ये मायावती आणि त्यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेल्या हत्तीचे अनेक पुतळे तयार करण्यात आले होते. एका वकिलाने याच्या विरोधात याचिका दाखल केली होती. याचिकेत मागणी करण्यात आली होती की, नेत्यांनी स्वतःचे आणि पक्षाच्या चिन्हांचे पुतळे उभारण्यासाठी जनतेचा पैसा खर्च न करण्याचे निर्देश दिले जावे.


विस्तृत सुनावणी 2 एप्रिलला
चीफ जस्टिस रंजन गोगोई यांच्या बेंचने म्हटले की, आमचे सध्याचे हे तात्पुरते मत आहे की, मायावतींना पुतळ्यांवर खर्च केलेली रक्कम सरकारी निधीत जमा करावी लागेल. याबाबत विस्तृत सुनावणी 2 एप्रिलला होईल.


मूर्त्यांसाठी खर्च केले होते 1400 कोटी
2007 ते 2011 दरम्यान उत्तर प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री मायावतींनी लखनऊ आणि नोयडामध्ये दोन पार्क तयार केले होते. त्यामध्ये मायावतींनी त्यांचा स्वतःच्या पुतळ्यासह, बसपाचे संस्थापक कांशीराम आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह पक्षाचे चिन्ह असलेल्या हत्तींचे अनेक पुतळे उभारले होते. यावर 1400 कोटींपेक्षा जास्त खर्च झाला होता. हत्तीचे दगडाचे 30 तर ब्राँझचे 22 पुचळे लावले होते. त्यावर 685 कोटी खर्च झाले होते. अंमलबजावणी संचलनालयाने यावर सरकारी तिजोरीला 111 कोटींचा फटका बसल्याचे प्रकरण दाखल केले होते.

X