आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नावाची काय बिशाद, प्रतिभा माझ्या खिशात' शरद पवारांनी घेतला उखाणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदापूर- येथे आयोजित कृषी प्रदर्शनात शनिवारी शरद पवारांची सभा गाजली ती त्यांनी घेतलेल्या उखाण्यामुळे. एरव्ही राजकीय खेळीत तरबेज असलेले पवार बोलण्याच्या ओघात उखाणे घेण्यातही किती तरबेज आहेत, हे उपस्थितांनी ऐकले आणि भरभरून दाद दिली. 

 

निमित्त होते कृषी प्रदर्शनाच्या समारोपाचे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे निमंत्रित होत्या. यात शरद पवार बोलायला उठले आणि त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी भाषणातून मोकळेपणाने आगळ्यावेगळ्या शैलीत संवाद साधला. विषयाला लागून विषय उखाण्यापर्यंत आला तेव्हा पवार सहजपणे म्हणाले, उखाण्याचं काय असतं... नावाची काय बिशाद, प्रतिभा माझ्या खिशात!' यावरून उपस्थितांत हास्याचे फवारे उडाले. एवढ्यात सुप्रिया सुळे यांनी माइकचा ताबा घेत आज त्यांना आमच्या घरात आईची नो एंट्री..' म्हणताच अवघी सभा खळखळून हसत सुटली. 

 

बातम्या आणखी आहेत...