आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रिय सुळेंचे सरकारला खुले आव्हान, म्हणाल्या- 'माझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- देशाबरोबरच राज्यात ईडी आणि सीबीआय चौकशीवरुन राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे थेट सरकारलाच इशारा दिला आहे. "हिम्मत असेल तर, माझ्याविरोधात ईडीची नोटीस काढून दाखवा", असे खुलं आवाहनच त्यांनी दिले. सुप्रिया सुळे "संवाद ताईंशी" या कार्यक्रमानिमित्त सोलापूर दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी व्यापारी, विद्यार्थी, वकील, वैद्यकीय क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधला.

पुढे त्या म्हणाल्या, "मी काही केलंच नाही, तर कुठून ईडी आणि सीबीआयची नोटीस पाठवणार? थोडे दिवस ईडी-सीबीआयवाले ताणतील, मात्र शेवटी मीच जिंकणार. आधी आमची सत्ता होती. एसी होता. सगळं काही गोल-गोल होतं. मात्र आता आमची सत्ता नाही. आता आम्हाला रस्त्यावर येऊन संघर्ष करायला मजा येत आहे. जरी त्रास झाला तरी पर्वा नाही संघर्ष करत राहणार, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

नेते विचारधारा वगैरे न पाहता पक्षांतर करतात, याची खंत सुप्रिया सुळेंनी बोलून दाखवली. सीबीआय, ईडी, बँका आणि साखर कारखाने या चार मुख्य कारणांमुळेच नेते पक्षांतर करत असल्याचे त्या म्हणाल्या. आतापर्यंत पक्षांतर करणाऱ्या कोणत्याही नेत्याने पक्षाविरुद्ध बोललं नसल्याचं समाधानही त्यांनी व्यक्त केले.