आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादी पक्षात आणि पवार कुटुंबात फूट, अजितदादांच्या निर्णयाने पवार, सुप्रिया सुळेंनाही धक्का

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करुन सत्ता स्थापन केल्याचे वृत्त झळकताच या मागे नक्कीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा ‘हात’ असू शकताे, अशी शंका महाराष्ट्रभर वर्तवली जात हाेती. मात्र अजितदादांचा हा निर्णय स्वत: शरद पवार व त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी धक्कादायक हाेता. ‘आमच्या पक्षात आणि पवार कुटुंबात फूट पडली आहे,’ असे व्हाॅट‌्सअॅप स्टेेट‌्स ठेवून अजितदादांच्या बहिणी सुप्रिया सुळे यांनी ही नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीतील काही निवडक आमदारांसह अजित पवार शनिवारी सकाळी राजभवनावर दाखल झाले हाेते. काॅंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे एकत्रित सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असताना अजित पवार मात्र भाजपशी संधान साधून हाेते, असे आता या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रवक्ते नवाब मलिक, राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांनीही शपथविधीबाबत आपल्याला काेणतीही माहिती नसल्याचे सांगितले. दरम्यान, सकाळी पक्ष फुटल्याचेे स्पष्ट हाेताच या नेत्यांनी थेट शरद पवार यांचे निवासस्थान गाठून पुढील रणनिती आखण्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली.

शरद पवार जो निर्णय घेतील तेच होईल : जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्ष शरद पवार यांच्यासोबतच असल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, अजित पवार हे रात्रीपर्यंत शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या बैठकीत होते. आज सकाळी पुन्हा बैठक होणार होती. त्यामुळे आज हा प्रश्न सुटणार होता. राष्ट्रवादीचा कोणताही आमदार फुटलेला नाही. पवार  जे सांगतील तेच होईल. आमदारांना इतरत्र कुठेही हलवण्याची गरज नाही. मी शरद पवारांसोबत जाऊन चर्चा करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...