आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत: मुख्यमंत्र्यांचं दत्तक नाशिकच कुपोषित असेल तर राज्याचे काय? - सुप्रिया सुळे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिक शहर तसेच इतर भागातील औद्योगिक क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर मंदी आली आहे. मोठमोठ्या कारखान्यांमधील कामगारांना सक्तीची सुट्टी देण्यात येत आहे. कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांचं दत्तक नाशिक कुपोषित झालं असल्याचा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.  अशी स्थिती नाशिकची असेल तर राज्याची काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नाशिकशी आमचं नातं जिव्हाळ्याचं आहे. सत्ता आल्यास नाशिक शहराचा विकास साधायचा असून नाशिकमध्ये आयटी पार्क आणू, त्यासाठी राष्ट्रवादीच्या पाठीशी मतदारांनी उभेच राहावे, असे आवाहनही सुळे यांनी केले. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संवाद दौरा झाला, या वेळी त्या बोलत होत्या. भाजप सरकारचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सातत्याने कामे न केल्याचे आरोप करत असतात मात्र, मला मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारायचा आहे की, आमचा माणूस तुमच्याकडे आला की स्वच्छ होतो का? तुमच्याकडे कोणती वॉशिंग पावडर आहे? यावर मुख्यमंत्री म्हणतात की आमच्याकडे “डॅशिंग रसायन’ आहे. पण लक्षात ठेवा सगळी रसायनं चांगली असतातच असे नाही. जाणाऱ्यांनो तुमच्यावर कोणते घातक रसायन टाकतील ते आधी बघा. अशी टीकाही खासदार सुळे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...