आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकार कोणाचेही आले तरी काँग्रेस व राष्ट्रवादीचीच मंडळी मंत्री होतील - सुप्रिया सुळे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - आम्ही जिंकलो तर आमचेच सरकार असेल आणि ते जिंकले तरी त्यांच्याकडे गेलेली काँग्रेस व राष्ट्रवादीचीच मंडळी मंत्री होतील. त्यामुळे येणारे सरकार काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचेच असेल, असा फॉर्म्युला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी सांगितला. संवाद यात्रेनिमित्त खासदार सुळे नगर दौऱ्यावर आल्या होत्या. विविध क्षेत्रांतील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. पत्रकारांशी बोलताना सुळे म्हणाल्या, आमच्यात असलेले त्यांना गुन्हेगार किंवा भ्रष्टाचारी वाटतात आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर वॉशिंग पावडरने धुवून स्वच्छ होतात. राज्यात येणारे आगामी सरकार हे काँग्रेस व राष्ट्रवादीचेच असणार आहे. आम्ही जिंकलो तरी आमचे व ते जिंकले तरी आमचेच सरकार असेल. कारण आमच्यामधूनच घेतलेल्या लोकांना ते मंत्री करणार आहेत. जे पक्ष सोडून जातात, ते पक्षावर किंवा शरद पवारांवर टीका करत नाहीत. कारण त्यांच्या मनात पवार साहेब आहेत, असेही सुळे म्हणाल्या. सीबीआय, ईडी या यंत्रणांचा दबावतंत्रासाठी वापर सुरू आहे, असा आरोपही  त्यांनी केला.

पूर्ण ताकदीने नव्याने संघटना बांधणी होईल
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे एकमेव असे नेते आहेत, जे सलग ५२ वर्षे निवडून आले आहेत. देशात असा दुसरा कोणताही नेता नाही. त्यांनी अनेक चांगले-वाईट दिवस पाहिले आहेत. त्यांचा आदर्श आमच्या समोर असून पूर्ण ताकदीने नव्याने संघटना बांधणी होईल, असे खासदार सुळे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...