आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर\' न्यू ईयर विशेष भाग, छोट्या सुरवीरांच्यावतीने गाण्याचा नजराणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 27 डिसेंबर, 2018 'सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर' या कार्यक्रमातील आपल्या सगळ्यांचे लाडके सुरवीर नव्या वर्षाचे स्वागत करण्यास सज्ज आहेत. त्यांच्या सुरेल गाण्यांनी हे सुरवीर नव्या वर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला एक सुरेल, सुरेख नजराणा देणार आहेत. विशेष म्हणजे या भागामध्ये एलीमनेटेड स्पर्धक देखील सहभागी होऊन कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढवणार आहेत. आपल्या सगळ्यांचा लाडका हर्षद नायबळ म्हणजेच मॉनिटर बनणार आहे “DJ”. या विशेष आठवड्याच्या भागामध्ये म्हणजेच 1 आणि 2 जानेवारीला 'भाई - व्यक्ती की वल्ली' या चित्रपटाची टीम मंचावर येणार आहे. महेश मांजरेकर, सुनील बर्वे, इरावती हर्षे, विद्याधर जोशी, सचिन खेडेकर आणि सागर देशमुख. तेव्हा येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज व्हा आपल्या लाडक्या छोट्या सुरवीरांसोबत 31 डिसेंबरला रात्री 9.30 पासून. तसेच 'भाई - व्यक्ती की वल्ली' चित्रपटाच्या टीमसोबत विशेष भाग बघायला विसरू नका. 1 आणि 2 जानेवारी रात्री 9.30 वाजता. 

 

31 डिसेंबर न्यू ईयर स्पेशल भागामध्ये देण्यात येणार आहेत काही खास पुरस्कार.. 
या न्यू ईयर स्पेशल भागामध्ये गाणी तर रंगणारच आहेत पण, काही हटके पारितोषिक देखील देण्यात येणार आहेत. सर्वोत्कृष्ट पालक पुरस्कार, पालकांचे पालक पुरस्कार, लेट लतीफ पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पीजे मार खा पुरस्कार, नखरेल ड्रामा क्वीन पुरस्कार, सर्वोत्कृष्ट हावभाव पुरस्कार शक्तिमान पुरस्कार. मात्र या पुरस्कारांचे मानकरी कोण ठरणार हे तुम्हाला 31 डिसेंबरच्या भागामध्ये कळणारच आहे. तसेच या भागामध्ये स्पर्धकांनी एका पेक्षा एक गाणी सादर केली आहेत. सई जोशीने लाल पैठणी रंग माझ्या, अंशिका चोणकरने इथेच टाका तंबू, मीराने वैकुंठाच्या राया हे नाट्यसंगीत सादर केले आहे, उत्कर्ष वानखेडे याने लाल इश्क हे गाणे सादर केले, चैतन्य देवढेने हे राजे आणि अभी मुझमे कही हे गाणे सादर केले. तसेच या भागाची रंगत अजूनच वाढणार आहे कारण, या भागामध्ये येणार आहेत एलिमनेटेड स्पर्धक ज्यांचे स्वागत सृष्टी पगारे हीने केले. तर मॉनिटरने या भागामध्ये DJ बनून काही औरच मज्जा आणली. तेव्हा बघायला विसरू नका 'सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर' या कार्यक्रमाचा न्यू इयर

 

स्पेशल भाग 31 डिसेंबर रोजी रात्री 9.30 वाजता..  

'भाई - व्यक्ती की वल्ली' विशेष भाग - 1 जानेवारी आणि 2 जानेवारी
या विशेष आठवड्याच्या भागामध्ये म्हणजेच 1 आणि 2 जानेवारीला 'भाई -  व्यक्ती की वल्ली' या चित्रपटाची टीम येणार आहे. महेश मांजरेकर, सुनील बर्वे, इरावती हर्षे, विद्याधर जोशी, सचिन खेडेकर आणि सागर देशमुख. छोट्या सुरवीरांनी या भागामध्ये पु.ल.देशपांडे यांच्याशी निगडीत गाणी सादर केली आहेत. तसेच स्वराली हिने सादर केलेले इरावती हर्षे यांच्या 'कासव' चित्रपटातील लेहरे समंदर हे गाणे ऐकून त्या भावूक झाल्या. या भागामध्ये मॉनिटर मावळा बनला असून त्याने मंचावर बरीच धम्माल मस्ती केली. तसेच महेश मांजरेकर आणि सुनील बर्वे यांनी सादर केलेल्या गाण्याने कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढवली.

 

बातम्या आणखी आहेत...