आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive: \'बिग बॉस\'च्या घरातून बाहेर पडली भांडखोर सुरभी, म्हणाली- \'चुकीच्या गोष्टींवर बोलणे आणि लोकांना सुधारणे माझी सवय, ट्रॉफी माझ्याकडे नाही पण विनर मीच\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'बिग बॉस' (Bigg Boss) ची सर्वात भांडकुदळ कन्टेस्टंट सुरभी राणा (Surbhi Rana) घरातून बाहेर आली आहे. बाहेर ययेऊन सुरभीने dainikbhaskar.com सोबत केलेल्या बातचीतीमध्ये अनेक गोष्टी शेयर केल्या. सुरभी म्हणाली की बिग बॉस (Bigg Boss) च्या घरात जाऊन मी माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण जगले आहेत. मला गर्व आहे, कारण प्रत्येकालाच ‘बिग बॉस’  मिळत नाही. एवढेच नाही, सुरभी हेदेखील म्हणाली,  ''विनरची ट्रॉफी कुणालाही मिळो, पण खरी विनर तर मीच आहे.  

 

सुरभी राणाशी केलेल्या प्रश्नोत्तरातील महत्वाचा भाग.. 

प्रश्न : ‘बिग बॉस’च्या घरातील अनुभव कसा होता?
उत्तर : थोडा आंबट थोडा गोड, पण एकूण अनुभव चांगलाच होता. वाद-विवाद, भांडणे हे सर्व आंबट आणि सलमान खानने केलेले कौतुक, टास्क जिंकण्याच्या अनुभवाला मी गोड म्हणेन. जेव्हा माझ्या बोलण्याला अप्रीशिएट केले जायचे आणि सांगितले जायचे की तू एक चांगली वक्ती आहेस, तेव्हा मला खूप छान वाटायचे. तिथून खूप चांगल्या मेमोरीज घेऊन बाहेर आले आहे. 

 

प्रश्न : घरात तुला तंटेखोर दाखवले गेले, तुझ्या याच पर्सनॅलिटीला जास्त दाखवले गेले का?
उत्तर : भांडण प्रत्येक जणच जातो , जगात अशी कोणतीच व्यक्ती नाही जिने भांडण केले नसेल. जर तुमची पर्सनॅलिटी लाउड असेल तर भांडणं जास्त ऐकू येतात. मला वाटते की चुकीच्या गोष्टीवर बोलणे आणि लोकांना बरोबर करणे चुकीचे नाही आणि मीही तेच करत होते. मला वाटते चिकीची गोष्ट असेल तर त्यावर बोललेच पाहिजे. मग लोक त्याला भांडण समजो अथवा अजून काही. 

 

प्रश्न : काय कारण वाटते की तुला कमी मते मिळाली?
उत्तर : माझ्या मते मी खूप चांगले परफॉर्म केले. दर्शकांच्या काय विचार होता मला माहित नाही. कुणाला वोट करायचे, नाही करायचे हा त्यांचा प्रश्न आहे. मीजास्त विचार करत नाही. देव जितके देईल, तितके चांगले देवो. मी एक आत्मविश्वासू व्यक्ती आहे. मी नेहमी स्वतःला या शोची विनरच मानेन, कारण मी येथून खूप शिकले आहे. बाकी ट्रॉफी कुणालाही मिळो, पण ‘बिग बॉस-12’ ची विनर तर मीच राहीन. 

 

प्रश्न : खऱ्या आयुष्यात कशाचा राग येतो आणि कोणत्या गोष्टी खूप आनंद देतात?
उत्तर : खऱ्या आयुष्यात कुटुंब आणि मित्र मैत्रिणीसोबत असले की मी खुश राहते कारण त्यांना तुमचा स्वभाव माहित असतो. हो, इमोशनली काही चुकीचे होताना किंवा सोसायटीचे नियम तुटताना पाहते, तेव्हा मला राग येतो. आनंदाचे बोलायचे झाले तर आईला पाहताच मी खुश होते. कदाचित प्रत्येकच व्यक्ती खुश होत असेल. याव्यतिरिक्त रफी साहेबांचे जुने गाणे ऐकू आले तरी मी आनंदी होते. तसे जर कुणी एखाद्या मुलीचा छेडले आणि तिकिटासाठी लागलेली लांब रांग पहिली की मला राग येतो. 

 

प्रश्न : तू या रियलिटी शोला किती रियल म्हणशील?
उत्तर : हा रियलपेक्षाही जास्त रियल असतो. असे प्रश्न ऐकून थोडा त्रास होतो, कारण आम्ही ते आयुष्य जगले आहे. जे काही घडते, ते सर्व खरे आहे. तिथे होणार आनंद, हसू आणि राग... सर्व काही रियल आहे. जर रियलिटीच्या वरतीही काही असेल तर ते ‘बिग बॉस’ आहे. ते 100 टक्के रियल असते. 

 

प्रश्न : तुझ्यामते कोण असेल विनर?
उत्तर : माझ्यामते तर मीच आहे. पण खरे सांगू तर करणवीर बोहराला ट्रॉफी मिळाली तर मनापासून आनंद होईल. असे इमानदार, खरे आणि आध्यात्मिक लोक मला फार आवडतात. 

 

बातम्या आणखी आहेत...