आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई : सूरज पंचोलीचा आगामी चित्रपट ‘हवा सिंह’ आहे. भारतीय बॉक्सिंग जगताचे पिता हवा सिंह यांचा तो बायोपिक आहे. याचा फर्स्ट लूक मंगळवारी स्वत: सलमान खानने रिलीज केला. पुढील पाच दिवसांत या चित्रपटाची संपूर्ण टीम शूटिंगसाठी हरियाणाला रवाना होत आहे. याचे दिग्दर्शन प्रकाश नांबियार करतील. चित्रपटासाठी सूरज पंचोलीने हवा सिंह यांच्यासारखे पिळदार शरीर बनवण्यासाठी १० किलो वजन वाढवले आहे. सूरजला बॉक्सर बनण्यासाठीचे प्रशिक्षण हवा सिंह यांचा मुलगा देत आहे.
कोण होते हवा सिंह?
कॅप्टन ‘हवा सिंह’ यांचा जन्म १६ डिसेंबर १९३७ रोजी हरियाणातील भिवानी जिल्ह्यातील उमरवास गावामध्ये झाला होता. १९ वर्षांचे असताना ते भारतीय सैन्यात समाविष्ट झाले आणि तिथेच त्यांनी बॉक्सिंग खेळायला सुरुवात केली. १९६० मध्ये त्यांनी त्या काळचे चॅम्पियन मोहब्बत सिंह यांना पराभूत करत वेस्टर्न कमांडचा किताब जिंकला होता. हवा यांनी १९६१ ते १९७२ पर्यंत लागोपाठ राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद पटकावले होते. त्यांच्या या विक्रमाची बरोबरी आजपर्यंत इतर कोणताच भारतीय बॉक्सर करू शकला नाही. एशियन खेळांमध्ये बॉक्सिंगसाठी दोन सुवर्णपदक जिंकणारे हवा एकमेव भारतीय बॉक्सर आहेत.
दररोज पिले दीड किलो दूध
हरियाणामध्ये आमचा कॅम्प लागला होता तेव्हा दररोज दिवसातून तीनवेळा प्रशिक्षण मिळत असे. मी तेथील व्यावसायिक बॉक्सर्ससोबत धडे घेत होतो. त्यांच्याच घरी जेवण करत होतो. हे जवळपास ४ ते ५ महिने चालले. परिणामी मी गेल्या पाच महिन्यांत या पात्रासाठी १० किलो वजन वाढवले. ‘गझनी’मध्ये वेट पुट ऑन करण्यासाठी आमिर दर दोन तासाला थोडे-थोडे खात होता. मी गेल्या ४-५ महिन्यांपासून दररोज दिवसातून १५-१६ अंडी खात आहे. दीड किलो दूध पीत आहे. नारळ पाण्याचा समावेशही आहारात असतो.
आदर राखणे आमचे कर्तव्य
हवा सिंह असो की मिल्खा सिंह, दोघांच्याही काळात प्रसार माध्यमांची संख्या खूप कमी होती. त्यामुळे त्या काळात त्यांना जी लोकप्रियता मिळायला हवी होती ती मिळाली नाही. चित्रपटांच्या माध्यमातून आम्ही या नायकांना लोकप्रिय करत आहोत. या चित्रपटातून लोक हवा सिंह यांची कामगिरी जवळून पाहतील. या सर्वच नायकांचा आदर राखणे आणि त्यांचे स्मरण करणे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे.
हा पूर्णपणे देशी चित्रपट आहे
आम्ही एक शुद्ध देशी चित्रपट बनवत आहोत. संपूर्ण शूटिंग भिवानीमध्ये हवा सिंह यांच्या खऱ्या घरामध्ये होईल. हा मूलत: बायोपिकच आहे. चित्रपटाचा पहिला लूक सलमानभाईने प्रसिद्ध केला आहे, परंतु तो या चित्रपटात काम करणार नाही.
सूरजने खास बातचीतमध्ये सांगितले...
‘या चित्रपटाची शूटिंग हवा सिंह यांच्या घरी व त्यांच्या मूळ गावी होईल. त्यांच्या कुटुंबातील तिसरी पिढीदेखील बॉक्सिंगचा वारसा पुढे नेत आहे. त्यांची नात नूपुर सिंह केवळ १८ किंवा १९ वर्षांची आहे. ती ऑलिम्पिक्ससाठी पात्रता मिळवत आहे. आपल्या ३ पिढ्या बॉक्सिंगमध्ये असलेले संपूर्ण जगात हे एकमेव कुटुंब असावे. तथापि, या चित्रपटात हवा सिंह बनण्यासाठी बॉडी ट्रान्सफॉरमेशनसोबतच बॉक्सिंग शिकण्यासाठीही मी खूप मेहनत घेतली आहे. हे पात्र मला ६ महिन्यांपूर्वी ऑफर केले होते. तेव्हापासूनच मी बॉक्सिंगच्या प्रशिक्षणाला सुरुवात केली होती आणि आपले वजन वाढवायलाही सुरुवात केली होती. याचे संपूर्ण प्रशिक्षण त्यांचा मुलगा संजय हवा सिंह यांनी दिले आहे. तसेच, मी विजेंद्र सिंहकडूनही बॉक्सिंगची ट्रेनिंग घेतली होती. मी सहा महिने हरियाणात राहिलो. यानंतर संजय मुंबईला आले व इथेच कॅम्प लावून चित्रपटातील इतर कलावंतांना बॉक्सिंगचे प्रशिक्षण दिले.’
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.