आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Suraj Pancholi Said I Want To Prove Myself Innocent But Those Who Made The Case Just Fled

सूरज पांचोली म्हणाला-  मी स्वत: ला निर्दोष सिद्ध करू इच्छितो; पण ज्यांनी केस केली तेच पळून गेले...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमेश कुमार उपाध्याय, मुंबईः चित्रपटापेक्षा जिया खान आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत असलेला अभिनेता सूरज पांचाेली आता या प्रकरणातून बाहेर पडू इच्छित आहे. नुकतीच त्याच्याशी भेट झाली. तेव्हा या प्रकरणामुळे तुझ्या आयुष्यावर काय परिणाम झाला, असे त्याला विचारले असता.. तो भावुक झाला आणि त्याने आमच्याशी यावर बरीच चर्चा केली...

  • सूरज पांचोलीची कहाणी त्याच्याच तोंडून...

'कोणताही माणूस असो त्याच्यावर एकदा आरोप लागला की त्याचे आयुष्य पूर्णपणे संपून जाते. मग तो आरोप खोटा असो की खरा... त्याच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही आणि त्यात स्वत:ला निर्दोष ठरवणे अवघड जाते. खरं तर, अशा प्रकरणात प्रत्येक माणूस स्वत:च एक कथा तयार करत असतो, त्यात त्याचा टाइमपास होतो. त्यावेळी माध्यमदेखील माझ्यासोबत चुकीची वागली. खरं तर, ते मला ओळखत नव्हते. ते जे एेकत होते ते दुसऱ्या पक्षाकडून येत होते. आतापर्यंत पोलिस किंवा तक्रारदारांकडून माझ्यावर जे आरोप केले होते त्याचा एकही पुरावा मिळाला नाही.'  'माझ्या चार्जशीटमध्ये काय लिहिले आहे, हे मीडियाने कधी वाचलेच नाही. कुणाच्या आयुष्याविषयी आपण काय लिहीत आहोत, याचा विचार करायला हवा. तुमच्या या लिखाणामुळे कुणाचे आयुष्य संपते, त्याच्याबरोबरच त्याच्या कुटुंबाचे आयुष्यदेखील संपते, याचा विचारच केला जात नाही. तुम्ही फक्त आपला टीआरपी वाढविण्यासाठी एका माणसाची भाकर हिसकावून घेत आहात. माझा काही पुरावा मिळाला असेल तर तुम्ही लोकांना बिनधास्त सांगा की ही व्यक्ती वाईट आहे. पण मी गप्प हाेतो म्हणून तुम्ही काहीही लिहाल का? याबद्दल आजपर्यंत मी माध्यमांशी बोललो नाही, कारण मला माहीत आहे, मला माध्यमांकडून नव्हे तर कोर्टाकडून न्याय मिळेल.'

  • प्रकरणावर केली चर्चा...

आज या प्रकरणाला ७ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मी माध्यमांशी बोलतोय. इतक्या वर्षात कोर्टानेदेखील काहीच निर्णय दिला नाही. ज्यांनी माझ्यावर केस केली तेच कोर्टात येत नाहीत. त्यांनी माझ्यावर ७ वर्षांपूर्वी केस केली होती. ते माझ्यावर केस करून लंडनला निघून गेले. दोन-तीन वर्षांनंतर माझी ट्रायल सुरू झाली. तेेदेखील मी स्वत:हून कोर्टात गेलो आणि ही गोष्ट प्रत्येकाच्या समोर यावी, म्हणून त्यांना ट्रायल सुरू करण्याचे सांगितले. यावरुनच मी चुकीचे काम करू शकत नाही, असे कळते. मी जर चुकीचा असेल तर तुम्ही सिद्ध करून दाखवा. मात्र कोर्टात येऊन उभे राहण्याची तुमची हिम्मतच नाही. ते कोर्टात का येत नाहीत, ते त्यांनाच विचारायला हवे.

  • करिअर आणि तो काळ....

'या प्रकरणामुळे माझ्या करिअरचे प्रचंड नुकसान झाले. ७ वर्षात मी बरेच काही सहन केले. मात्र या सर्व प्रकरणामुळे मी सशक्त बनलो, हीच देवाची इच्छा असावी, असे मला वाटते. या माध्यमातून मी लोकांना एकच गोष्ट सांगेन की, तुम्ही एखाद्याविषयी काही वाचत असाल, पण त्यात तथ्य नसेल, पुरावा नसेल तोपर्यंत कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. तेव्हा मी यंग हाेतो, तेव्हा काय चाललंय हेच कळत नव्हतं. आजच्या तरुणांना पाहा त्यांचे रिलेशनशिप बनते आणि मोडतेदेखील पण कुणालाच काही फरक पडत नाही. तेव्हा मी फक्त २१ वर्षाचा होतो, तेव्हा माणूस मॅच्युअर असतो का ? त्या काळात माझ्या कुटुंबाने मला सर्वात जास्त साथ दिली.

  • तुरुंगातील अनुभवाविषयी...,

तुरुंगातील अनुभव फारचं वाईट होता. त्यांनी मला अंडा सेलमध्ये ठेवले होते. तेथे मला खूपच चुकीची वागणूक देण्यात आली. कारण मी एका सिने कुटुंबातील मुलगा आहे. मोठ्या घरातील मुलगा आहे, त्यामुळे याला शिक्षा द्या.. अंडा सेलमध्ये मला एकट्याला ठेवण्यात आले. पोलिस कस्टडीपासून ते तुरुंगापर्यंत मी एकटाच होतो. तेथे एक महिना घालवला. तेथे फक्त वरणभातच खायला मिळत होते. त्या काळात माझ्या आईने मला खूप धीर दिला. तिचा माझ्यावर विश्वास होता, ती ठामपणे माझ्यासोबत उभी होती.

बातम्या आणखी आहेत...