आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेंगाबिंगा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या सगळ्या शेंगा, आणि बीन्स
म्हणजे छोटा भारतच अाहेत.
कोणी जुन्या पद्धतीच्या आवरणात,
कधी तरी रात्रभर अभ्यंगस्नानात गुंग,
मग
सकाळी कपडे बदलून स्वस्थ
आणि कधी तरी मग
‘मोड भव’ असा आशीर्वाद मिळून,
नव्या कशाची तरी चाहूल.
कोणी स्वतःला फेअर अँड लव्हली समजून
पाण्यात मनसोक्त डुंबून,
वाफेचे फेशियल करत,
कुणा कुणाच्या शिट्ट्या ऐकत
नवीन दिवसाला सज्ज.
कोणी मुळातच कमनीय 
श्यामलवर्ण सुंदऱ्या,
याही पाण्यात विहरतात,
आणि वाफेशी खेळता खेळता लाजून
पाण्याला गुलाबी करतात.
काही शांत, गडद काळ्या घेवड्याचे वंशज,
कोणाशी न मिसळता
कांदा लसणाची स्वप्नं बघत
आपल्याच धुंदीत मग्न.
श्रावणात बाहेर न पडलेले घेवडे,
आपापल्या शेंगांतून,
‘श्रावणात घननिळा’ गात,
गुलाबी छटा दाखवत भाद्रपदात बाहेर
आणि
आपले गाव सोडून
देश बघायला बाहेर पडलेल्या
दुरंगी राजम्याने त्यांचे केलेले स्वागत
एकीकडे अचानक मग
भाज्यांच्या निवडणुकीत
पार्टीने तिकीट दिल्याच्या अहंकारात
पावट्याचा उग्र पवित्रा.
रंग, रूप, जात, कूळ कुठलेही असो,
कोणी एकटं कधीही नसतं;
सगळ्यांच्या विकासासाठी
कांदे, लसूण, आलं, खोबरं, मसाले, चिंच,
टोमॅटो, जिरं
हे सर्व आणि बरेच कोणी,
राष्ट्रीय शेंगा उत्कर्ष अभियानातर्फे
कायम हजर असतात.
आज
ऐक्य आपल्याला समजत नाही
पण शेंगांना कळतं नं!

बातम्या आणखी आहेत...