Home | News | Surat Accident : Bollywood celebrity like Amitabh Bachchan, Shraddha Kapoor reacted on surat fire attack and died children

सूरत अपघात : अमिताभ यांच्यापासून ते श्रद्धा कपूरपर्यंत, मारल्या गेलेल्या मुलांसाठी बॉलीवूडने व्यक्त केले दुःख 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - May 26, 2019, 05:21 PM IST

कोचिंगच्या संचालकाला पोलिसांनी केले अटक... 

 • Surat Accident : Bollywood celebrity like Amitabh Bachchan, Shraddha Kapoor reacted on surat fire attack and died children

  बॉलिवूड डेस्क : सूरतच्या सरथाणा जकातनाकाच्या तक्षशिला आर्केडमध्ये आग लागल्यामुळे 23 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि सात मुलांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे स्तब्ध बॉलिवूड सेलेब्रिटीजनेही सोशल मीडियावर दुःख व्यक्त केले आहे. घटनेच्यावेळी आर्ट्स कोचिंगमध्ये 60 मुले होती. 13 मुलांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या इमारतीवरून उडी मारली. यातील तिघांचा उडी मारल्याने मृत्यू झाला. कोचिंगच्या संचालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

  या सेलिब्रिटींनी व्यक्त केले दुःख...

  अमिताभ बच्चन यांनी लिहिले...
  सूरतमध्ये एक भयानक घटना. विनाशकारक आग. त्यामध्ये मारमारली गेली 14-17 वर्षांची मुले. जीव वाचवण्यासाठी उडी मारली पण वाचले नाहीत. व्यक्तही न करता येणारे दुःख..

  जावेद अख्तर यांनी पोस्ट केली...
  ही खरंच खूप मोठी आपत्ती होती. सूरतमध्ये 17 मुले जाळून मेली. मला त्यांच्या कुटुंबियांबद्दल आणि मित्रांबद्दल संवेदना आहेत. देशाच्या सर शहरांच्या नगरपालिकांना अग्नि सुरक्षा नियमांचे पळत करून घेणे आणि प्रत्येक इमारत बनवण्यासाठी कडक होण्याची गरज आहे.

  श्रद्धा कपूरने लिहिले...
  सूरतच्या घटनेमुळे खूप दुखी आहे. या आपत्तीबद्दल ऐकून खूप झटका लागला आणि दुःख झाले. खूपच दुर्दैवी मृत्यू आलेल्या त्या मुलांसाठी प्रार्थना करते.

  शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्वीट केले...
  खूपच दुःखद.. सूरतच्या सरथानामध्ये आग लागलेल्या त्या भयानक आणि दुर्भाग्यपूर्ण घटनेने खूप दुःख झाले. मारले गेलेले जास्तीत जास्त युवा आणि किशोरवयीन होते. त्यांच्यासाठी माझ्या हार्दिक संवेदना आणि प्रार्थना, ज्यांनी आपल्या व्यक्तीला गमावले.

  सोनू सूदने व्यक्त केले दुःख...
  सूरतमधील आग लागलेल्या घटनेबद्दल ऐकून दुःख झाले. एवढ्या सगळ्या अनमोल मुलांनी जीव गमावला. एवढे भयावह! त्यांच्या कुटुंबांसाठी मला खूप दुःख वाटते ज्यांनी आपली मुले गमावली.

  सुनील ग्रोवरचेही आले ट्वीट...
  सूरतमध्ये जीव गमावलेल्या मुलांसाठी प्रार्थना. असे व्हायला नको होते.

  गुरु रंधावाने लिहिले...
  सूरतमधील सर्वांसाठीच प्रार्थना. देव त्या मुलांच्या कुटुंबियांना दुःख सहन करण्याची शक्ती देवो जे या घटनेत बचावले नाहीत.

 • Surat Accident : Bollywood celebrity like Amitabh Bachchan, Shraddha Kapoor reacted on surat fire attack and died children

Trending