आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Surat Couple Wedding Card Gone Viral On Social Media, Couple Seek Vote For BJP From Their Card Told About Dassault Rafale

व्हायरल होत आहे हे अनोखे वेडिंग कार्ड, कपलने छापले- आम्हाला काही नका देऊ फक्त यांना दान करा, आम्ही समजून घेऊ आम्हाला मिळाले...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत- PM नरेंद्र मोदी यांचे फॅन असलेल्या कपलच्या लग्नाचे कार्ड सोशल मीडियावर सध्या खुप व्हायरल होत आहे. कार्डमध्ये त्यांनी नरेंद्र मोदीला व्होट आणि बीजेपीला दान देण्याची अपील केली आहे. त्यात लग्नाच्या आमंत्रणाशिवाय राफेल डीलबद्दल काही फॅक्ट्स सांगितले आहेत. चकीत करणारी बाब म्हणजे ज्या कपलचे लग्न आहे त्यांच्या घरात कोणी बीजेपीचा नेता नाही आणि कोणी राजकारणातही नाही.


होणाऱ्या बायकोची आहे आयडीया

- लग्नाचे कार्ड छापणारे युवराज सुरतच्या सिटीलाइटमध्ये राहतात. तो इंजिनिअर आहे आणि आयआयटी जेईईची कोचींग घेतो.

- त्याचे लग्न इंजीनिअर साक्षीसोबत 22 जानेवारीला होत आहे. लग्नाच्या कार्डमध्ये युवराजने लग्नाबद्दल कमी आणि राफेल डीलबद्दल जास्त सांगितले आहे.

- युवराजने सांगितले की, मी आणि माझी होणारी बायको पीएम मोदीचे फॅन आहोत, आणि साक्षीनेच मला अशाप्रकारच्या कार्डची आयडीया दिली आहे.

 

काय लिहीले आहे कार्डमध्ये

- कार्डमध्ये लिहीले, आमच्यासाठी हेच गिफ्ट असेल की, तुम्ही नमो अॅपवरून बीजेपीला कॉन्ट्रिब्यूट करा. आम्हाला हेच गिफ्ट असेल की, 2019 मध्ये तुम्ही बीजेपीला व्होट द्या.

- कार्डच्या दुसऱ्या बाजुला लिहीले, 'कीप काम अँड ट्रस्ट नमो' शांति ठेवा आणि नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवा. याला दोन राफेलच्या विमानात कोट केले आहे.
 

बातम्या आणखी आहेत...