Home | National | Gujarat | Surat Doctor Raped Married women While Husband Sat Next Room

पती बाहेर बसलेला, आत पत्नीवर रेप करत होता डॉक्टर, हद्द म्हणजे आरोपीने दुसऱ्या दिवशीही चेकअपला बोलावले

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 07, 2018, 09:31 AM IST

चेकअपच्या बहाण्याने डॉक्टर तिला आपल्या चेंबरमध्ये घेऊन गेला. त्याने जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर रेप केला.

 • Surat Doctor Raped Married women While Husband Sat Next Room

  सुरत - एका 28 वर्षीय महिलेने मंगळवारी गायनॅकोलॉजिस्टवर रेप केल्याचा आरोप केला आहे. महिलेने सांगितले की, उपचारांसाठी ती शहरातील 'मी अँड मम्मी' हॉस्पिटलमध्ये गेली होती. चेकअपच्या बहाण्याने डॉक्टर तिला आपल्या चेंबरमध्ये घेऊन गेला. त्याने जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर रेप केला. महिलेला मेडिकलसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले होते. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


  पती बाहेर बसलेला आणि आरोपी डॉक्टर आत महिलेवर रेप करत होता
  - सुरतच्या नानपुरातील मी अँड मम्मी हॉस्पिटलमध्ये मूल नसल्याने उपचार करण्यासाठी आलेल्या महिलेने डॉ. प्रफुल दोषीवर बलात्काराचा आरोप केला आहे.

  - पीडिता म्हणाली- लग्नाच्या 5 वर्षांनंतरही ती नि:संतान आहे. यामुळे तिने अनेक ठिकाणी उपचार घेतले. परंतु तरीही कोणताही फायदा झाला नाही. तेव्हा 4 सप्टेंबर रोजी आपल्या पतीसोबत नानपुरामध्ये डॉ. प्रफुल्ल दोषी यांच्या मी अँड मम्मी हॉस्पिटलमध्ये गेली होती. हॉस्पिटलमध्ये अडीच तासांपर्यंत प्रतीक्षा केल्यानंतर दीड वाजता आत गेली.

  - डॉ. प्रफुल दोषीच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिचा पती खुर्चीवर बसला. चेकअपसाठी त्याच्यासोबत डॉक्टर आणि एक नर्स कन्सल्टिंग रूममध्ये गेले.

  - आत सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरने नर्सला इंजेक्शन द्यायला सांगितले. ती बेडवर झोपलेली होती, तेव्हा त्या वेळी तेथे दुसऱ्या नर्सने येऊन तिला इंजेक्शन लावले आणि बाहेर निघून गेली.
  - आता रूममध्ये ती आणि डॉक्टरच होते. तिला एकटी पाहून डॉक्टर म्हणाला- जर तू ही गोष्ट कुणाला सांगितली तर इंजेक्शन देऊन तुला जिवे मारीन. यानंतर घाबरून ती गप्प बसली. मग डॉक्टरने तिच्यावर रेप केला. रेप केल्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी आययूआयचे इंजेक्शन घेण्यासाठी बोलावले. यानंतर ती बाहेर आली जेथे तिचा पती बसलेला होता. तेथून निघून बाहेर काउंटरवर बिल जमा केले.

  - हॉस्पिटलच्या खाली पार्किंगमध्ये गेल्यानंतर तिने पूर्ण घटना पतीला सांगितली. घरी पोहोचताच पती आणि नातेवाइकांनी मिळून डॉ. प्रफुल दोषीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली.

  डॉ. प्रफुल दोषी सुरत शहरातील पहिले गायनिक डॉक्टर आहेत, ज्यांनी शहरातील पहिले इन विट्रो फर्टिलाइजेशन (आयव्हीएफ) द्वारे मूल जन्माला घातले होते.


  लग्नानंतर अनेक वर्षे होऊनही मूल नाही म्हणून डॉक्टरकडे गेली महिला
  - पीडित महिला दीड महिन्यापासून डॉ. प्रफुलकडे उपचार घेत होती. ती हॉस्पिटलमये 4 ते 5 वेळा आली होती. लग्नाच्या 5 वर्षांनंतरही मूल नसल्याने महिलेने अनेक गायनिक डॉक्टरांकडून उपचार घेतले. परंतु कोणताही उपचार परिणामकारक न ठरल्याने पीडिता या डॉक्टरकडे गेली होती.
  - रेपची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी बुधवारी डॉ. प्रफुल्ल दोषीच्या मी अँड मम्मी हॉस्पिटलमध्ये जाऊन स्टाफची चौकशी केली. अठवा पोलिसांनी पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी अर्ध्या रात्री शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले.

  - पोलिस इन्स्पेक्टर एस. बी. भरवाड म्हणाले, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. तपास पूर्ण झाल्यावरच काही सांगता येईल.

  पुढच्या स्लाइडवर पाहा, या प्रकरणाचे आणखी Photos...

 • Surat Doctor Raped Married women While Husband Sat Next Room
 • Surat Doctor Raped Married women While Husband Sat Next Room
 • Surat Doctor Raped Married women While Husband Sat Next Room

Trending