आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरत अग्निकांड : १२ तासांत कारवाई न केल्यास उपोषण; हार्दिकचा इशारा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत - सुरत येथील तक्षशिला अग्निकांड प्रकरणात १२ तासांच्या आत महापौर आणि अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई झाली नाही तर आपण उपोषण सुरू करू, असा इशारा काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनी रविवारी दिला. या अग्निकांडात २० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता.


तक्षशिला आर्केडला भेट दिल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना हार्दिक पटेल यांनी आरोप केला की, राज्य सरकार या प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न आणि हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे. राज्य सरकारने ट्यूशन क्लासच्या व्यवस्थापकालाच अटक का केली? ज्यांनी अवैधपणे इमारत बांधली त्यांना अटक का करण्यात आली नाही? असे प्रश्न त्यांनी विचारले. सुरतला स्मार्ट सिटी बनवण्याच्या केंद्र सरकारच्या दाव्याची खिल्ली उडवताना हार्दिक म्हणाले की, अग्निशमन विभागाचे साहित्य चौथ्या मजल्यापर्यंत पोहोचू शकले नाही. त्यावरून स्मार्ट सिटीचे नियोजन कसे केले जात आहे हे दिसते. अग्निशमन दल ४० मिनिटे उशिराने पोहोचलेच, पण त्यांच्याकडे पाणीही नव्हते. 

बातम्या आणखी आहेत...