आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Surat : Made Modi's Picture On 1.48 Carat Diamond Of 10 Thousand Dollars, Took Three Months

10 हजार डॉलरच्या 1.48 कॅरेट हिऱ्यावर साकारली मोदीची प्रतिमा, तीन महिन्यांपासून करत होते काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूरत - हिरे उद्योजक केयूर मियानी आणि आकाश सलियाने 1998 मध्ये त्यांच्या आजोबांनी खरेदी केलेल्या एक हिऱ्यापैकी 1.48 कॅरेटच्या व्हाइट(एफ)वर भारताचा नकाशा तयार केला. एवढेच नाही तर त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीची प्रतिमा काढली आहे.  
लेजर इंस्क्रिप्शन तंत्रज्ञानाच्या सहायाने हिऱ्यात नरेंद्र मोदींची प्रतिमा बनवण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी लागला. या हिऱ्याची किंमत त्यावेळी 45 हजार रुपये होती. आज त्याची किंमत 10 हजार डॉलर आहे. उद्योजकांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बेटी बचाओ, स्वच्छता अभियान आणि विविध योजनांनी प्रभावित होऊन हिऱ्यावर त्यांची प्रतिमा बनवली आहे. आता ते याला मोदींनी भेट स्वरुपात देणार आहेत.